Mumbai-Surat Local : कसारा-नाशिक लोकलंच माहित नाही,पण सूरतला लोकलनं जाता येणार; रेल्वेचा प्लॅन काय?
Last Updated:
Mumbai to Surat : काय सांगता आता मुंबईतून सुरतपर्यंत लोकलचा प्रवास करता येणार आहे. हा प्रकल्पामुळे खरंच हा प्रवास शक्य आहे का किंवा कसा असेल हा प्रकल्पत्याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मुंबई : मुंबई : गेल्या काही वर्षांत कसारा-नाशिक लोकल प्रकल्पाची जोरदार चर्चा सर्वत्र होत असताना एका मुंबई ते सुरत दरम्यान ट्रेन धावणार असल्याची प्रस्तावाने लक्ष वेधले आहे. हा नेमका प्रकल्प कसा असणार किंवा हा प्रकल्प खरंच शक्य आहे का?याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे रेल्वेचा नवा प्लॅन?
मुंबई शहराच्या उत्तरेकडे सध्या झपाट्याने वाढ आणि गुजरातमधील वाढता औद्योगिक रोजगार मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्यामुळे हा दररोजचा होत असलेला नागरिकांचा प्रवास पाहता भविष्यात मुंबई ते गुजरात दरम्यान सबर्बन लोकल सेवा सुरु होण्याच्या चर्चेला सुरत रेल्वे स्थानकाच्या रिडेव्हलपमेंट प्रकल्पामुळे नवे बळ मिळत आहे. सध्या सुरू असलेल्या मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब प्रकल्पात दोन स्वतंत्र सबर्बन प्लॅटफॉर्म उभारले जात आहे, त्यामुळे भविष्यात मुंबई आणि गुजरात हे उपनगरीय रेल्वे नेटवर्कद्वारे जोडले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
advertisement
एक्सप्रेस आणि लोकलची जुंपण थांबणार?
मुंबई ते गुजरात ही लोकल सेवा सुरु करताना त्यातील महत्त्वाचा भाग हा दोन स्वतंत्र सबर्बन प्लॅटफॉर्म असणार आहेत. सध्या मुंबई उपनगरीय रेल्वेची मर्यादा ही विरार तसेच डहाणूपर्यंत आहे. मात्र यापुढे वापी, वलसाड, नवसारी आणि सुरतपर्यंत मोठ्या प्रमाणावर दैनंदिन प्रवासी प्रवास करत आहेत. तर सुरतचा डायमंड उद्योग, टेक्सटाईल मार्केट, वापी- वलसाड औद्योगिक पट्टा तसेच मुंबईतील सेवा क्षेत्र यामुळे या मार्गावरील प्रवासी संख्या सातत्याने वाढत आहे.
advertisement
विरार-सुरत नमो भारत आणि वंदे मेट्रो
मेमू आणि डेमू प्रकारातील काही गाड्या या मार्गावर धावत असल्या तरी पूर्ण विकसित सबर्बन नेटवर्कसारखी वारंवार सेवा उपलब्ध नाही. आता याच पार्श्वभूमीवर सुरत स्टेशनवर उभारले जाणारे स्वतंत्र सबर्बन प्लॅटफॉर्म हे भविष्यातील रेल्वेचे नियोजनात 200 ते 300 किमी अंतरासाठी नमो भारत आणि वंदे मेट्रोसारख्या जलद शहरी रेल्वे सेवांवर भर दिला जात आहे. त्यानुसार आता विरार ते सुरत दरम्यान अशा आधुनिक सबर्बन सेवा सुरू होण्याची योजना आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 27, 2026 2:38 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai-Surat Local : कसारा-नाशिक लोकलंच माहित नाही,पण सूरतला लोकलनं जाता येणार; रेल्वेचा प्लॅन काय?








