कोकण प्रवाशांसाठी खुशखबर! दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसच्या वेळेत बदल; काय आहे नवीन वेळापत्रक?
Last Updated:
Diva-Sawantwadi Express Update : मध्य रेल्वेने दिवा-सावंतवाडी रोड एक्सप्रेसच्या वेळेत बदल केलेला आहे. नक्की हा बदल कसा असेल ते जाणून घ्या.
advertisement
1/6

प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर व्हावा आणि रेल्वेगाड्या निर्धारित वेळेत धावाव्यात यामुळे मध्य रेल्वेने दिवा-सावंतवाडी रोड-दिवा एक्सप्रेसच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
2/6
मध्य रेल्वेच्या निर्णयानुसार ट्रेन क्रमांक 10105 आणि 10106 या दोन्ही गाड्यांच्या वेळा 'प्रीपोन'म्हणजेच काही मिनिटे आधी करण्यात आल्या आहेत. हे सुधारित वेळापत्रक येत्या 12 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे.
advertisement
3/6
दिवा ते सावंतवाडी रोड दरम्यान धावणारी ट्रेन क्रमांक 10105 सध्या रोहा स्थानकावर सकाळी 9.00 ते 9.05 या वेळेत थांबत होती. मात्र नव्या वेळापत्रकानुसार हीच गाडी आता रोहा स्थानकावर सकाळी 8.50 ते 8.55 या वेळेत थांबणार आहे. त्यामुळे सकाळच्या वेळेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचणार असून पुढील प्रवास अधिक सोपा होण्यास मदत होणार आहे.
advertisement
4/6
त्याचप्रमाणे सावंतवाडी रोड ते दिवा मार्गावर धावणारी ट्रेन क्रमांक 10106 सध्या सायंकाळी 5.20 ते 5.25 या वेळेत संबंधित स्थानकावर थांबत होती. सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी आता सायंकाळी 5.05 ते 5.10 या वेळेत धावणार आहे.
advertisement
5/6
दरम्यान वेळापत्रकात झालेल्या या बदलांमुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वेचे नवीन वेळापत्रक तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.
advertisement
6/6
या बदलामुळे संध्याकाळच्या वेळी प्रवास करणाऱ्या नोकरदार, विद्यार्थी आणि नियमित प्रवाशांना वेळेत त्यांच्या ठिकाणी पोहोचणे शक्य होणार आहे शिवाय कोकण मार्गावरील प्रवास अधिक वेगवान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/बातम्या/
कोकण प्रवाशांसाठी खुशखबर! दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसच्या वेळेत बदल; काय आहे नवीन वेळापत्रक?