TRENDING:

Wedding Tradition : अक्षता, ओटी आणि माप; लग्नात तांदळाचं इतकं महत्त्व का? इतर धान्य का नाही वापरत?

Last Updated:
Wedding Tradition Rice importance : लग्नात अक्षता टाकण्यापासून ते गृहप्रवेशापर्यंत तुम्ही तांदळाचा वापर पाहिला असेल. पण मग तांदूळच का इतर धान्य का नाही? असा विचार तुम्ही कधी केला का?
advertisement
1/5
अक्षता, ओटी आणि माप; लग्नात तांदळाचं इतकं महत्त्व का? इतर धान्य का नाही वापरत?
लग्नाला गेलात तर तुम्ही पाहाल तिथं लग्न मुहूर्तावर लग्न लावताना शुभमंगल सावधान म्हणत नवरा-नवरीच्या अंगावर अक्षता म्हणजे तांदूळ टाकतात. नवरीची ओटी भरताना त्यात तांदूळ असतात, त्यानंतर गृहप्रवेशावेळीही कलशात किंवा मापट्यात तांदूळ ठेवले जातात.
advertisement
2/5
लग्न असो वा कोणतंही शुभकार्य, हिंदू धर्मात तांदूळ इतका महत्त्वाचा का? तांदूळच का वापरला जातो, इतर धान्य का नाही? असा प्रश्न तुम्हालाही कधी ना कधी पडला असेल.
advertisement
3/5
तांदळाला अक्षय धन म्हटलं जातं. म्हणजे सहज खराब न होणारं, टिकाऊ. आणि समृद्धीचं प्रतीक. तांदळाचा कण शुभ्र असतो म्हणजे शुद्धता आणि शांततेतचं प्रतीक
advertisement
4/5
तांदळामध्ये नकारात्मक ऊर्जा कमी करून सकारात्मक ऊर्जा वाढवण्याची क्षमता असल्याचं मानलं जातं. तांदळाचा एक दाणा म्हणजे सुरुवात आणि अनेक दाणे म्हणजे वाढ आणि भरभराट म्हणून कपाळाला तांदूळ लावताना ते जास्त चिकटले की महिला धन्यता मानतात.
advertisement
5/5
शुभकार्यात तांदूळ वापरण्याचा अर्थ म्हणजे आपल्या जीवनात भरभराट, सुख समृद्ध आणि अखंड आनंद. भारतीय संस्कृतीत तांदळाशिवाय कोणतंही शुभकार्य पूर्ण होत नाही. तसाच इतर धान्यांपेक्षा तांदूळ हलका आणि सहज पसरणार असल्याने तो टाकल्यानंतर आशीर्वादच पसरतो असं वाटतं. (सर्व फोटो : AI Generated)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/बातम्या/
Wedding Tradition : अक्षता, ओटी आणि माप; लग्नात तांदळाचं इतकं महत्त्व का? इतर धान्य का नाही वापरत?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल