photos : बुलढाण्यात भीषण अपघात; ट्रकनं झोपेत असलेल्या मजुरांना चिरडलं; 4 ठार 9 गंभीर जखमी
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
बुलढाणा जिल्ह्यातून पुन्हा एकदा भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. मुंबई- नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मोठा अपघात झाला आहे.
advertisement
1/5

बुलढाणा जिल्ह्यातून पुन्हा एकदा भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. मुंबई- नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मोठा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये चार जण जागीच ठार झाले आहेत, तर नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत.
advertisement
2/5
मुंबई- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वडनेर भोलजी गावाच्या परिसरात हा अपघात झाला. नाल्याचे बांधकाम करणाऱ्या मजुरांना ट्रकनं चिरडलं आहे. ट्रकवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
advertisement
3/5
वडनेर भोलजी गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या नालीचे बांधकाम सुरू होते. हे मजूर तिथेच तंबू टाकून झोपले होते. याच दरम्यान ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानं ट्रक मजुरांच्या अंगावर आला. या घटनेत चार जण जागीच ठार झाले असून, नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत.
advertisement
4/5
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. जखमींना स्थानिकांच्या मदतीनं मलकापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.
advertisement
5/5
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, ट्रक ताब्यात घेतला आहे. मृतक हे अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदरा तालुक्यातील असल्याची माहिती मिळत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/फोटो गॅलरी/
photos : बुलढाण्यात भीषण अपघात; ट्रकनं झोपेत असलेल्या मजुरांना चिरडलं; 4 ठार 9 गंभीर जखमी