जंगलाचा खरा राजा कोण, वाघ की सिंह? तज्ज्ञांनी सांगितलं सत्य, पण तुम्हाला काय वाटतं?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
जंगल म्हटलं की आपल्याला जंगलाचा राजा कोण? असा प्रश्न पडतो. सोशल मीडियावर कुणी वाघाला तर कुण सिंहाला शक्तीमान असल्याचं सांगतं.
advertisement
1/5

वाघ आणि सिंह हे जंगलातील सर्वात सामर्थ्यशाली आणि ताकदवान प्राणी आहेत. मात्र, अनेकदा या दोघांमध्ये अधिक सामर्थ्यवान कोण? किंवा जंगलाचा राजा कोण? असा प्रश्न अनेकांना पडतो. सोशल मीडियावर कधी सिंह तर कधी वाघाला जंगलाचा राजा म्हणून सांगितलं जातं. परंतु, वन्यजीव तज्ज्ञांनीच जंगलाचा खरा राजा कोण? याबाबत माहिती दिलीय.
advertisement
2/5
बहुतेकांना वाटतं की, वाघांपेक्षा सिंह अधिक शक्तिशाली आणि आक्रमक असतात. पण प्रत्यक्षात तसं नाही. प्रौढ नर वाघाचं वजन 300 किलोपर्यंत असू शकते, तर प्रौढ नर सिंहाचं वजन केवळ 200 किलोपर्यंत असतं, असं गेल्या 25 वर्षांपासून वन्यजीवांवर काम करणारे वन्यजीव तज्ज्ञ स्वप्निप खताळ सांगतात.
advertisement
3/5
वाघ आणि सिंह हे दोन्ही प्राणी बिग कॅट कुलातील आहेत. पण शारीरिक रचनेचा विचार करता सिंहापेक्षा वाघ मोठा आणि फिट असतो. वाघाची उंची आणि लांबीही सिंहापेक्षा जास्त असते. वाघाची उंची साडेतीन फुटांपर्यंत आणि लांबी 10 फुटांपर्यंत असते, तर सिंह यापेक्षा कमी असतो.
advertisement
4/5
वाघाचे सुळे दात हे 5 इंच लांब असतात, तर सिंहाचे 3 ते 4 इंचाचे असतात. सिंहांच्या तुलनेत वाघ पाण्यात तासनतास सहज पोहू शकतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाघाने एखाद्याला आपलं भक्ष्य मानलं की, तो त्याला मारतोच. मग तो महाकाय हत्ती वा अन्य कोणताही प्राणी असो. परंतु, बऱ्याचदा सिंह शिकार सोडूनही देतात.
advertisement
5/5
वाघ शक्तीशाली की सिंह हे सांगताना स्वप्नील यांनी तुर्कीतील एका घटनेबाबत सांगितलंय. तुर्कीतील एका प्राणीसंग्रहालयात वाघ आणि सिंह एकत्र ठेवले होते. त्यांनी एकमेकांवर हल्ला केला. वाघाने सिंहाच्या डोक्यावर जोरात पंजा मारला. आपल्याला आश्चर्य वाटेल, पण या एका फटक्याने सिंह जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. अर्थात यावरून आपल्याला जंगलाचा खरा राजा कोण हे समजलंच असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/फोटो गॅलरी/
जंगलाचा खरा राजा कोण, वाघ की सिंह? तज्ज्ञांनी सांगितलं सत्य, पण तुम्हाला काय वाटतं?