TRENDING:

कटा भी और बटा भी नही? भाजपा खासदाराच्या मटण पार्टीत तुफान राडा, ताटातून नळ्याच गायब

Last Updated:
BJP Mutton Party: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे' या घोषणेवरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वादंग उठलाय. अशात भाजपाच्या एका मटण पार्टीत मटणाच्या नळ्यांवरून झालेला वाद सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. मटण पार्टीत नुसता रस्सा वाढल्यानं लोकांचा पारा चढला...मग काय, नुसती हाणामारी आणि तुफान राडा. 
advertisement
1/7
कटा भी और बटा भी नही? भाजपा खासदाराच्या मटण पार्टीत तुफान राडा, ताटात नळ्या नाही
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार केला जातोय. ही प्रचाराची तोफ 18 नोव्हेंबरला थंडावेल. त्यामुळे सध्या सभांचा धडाका सुरूये. नेते, कार्यकर्ते वारंवार एकमेकांची भेट घेताहेत. सभांच्या ठिकाणी खाण्याचीही जोरदार व्यवस्था केली जातेय.
advertisement
2/7
भारतीय जनता पक्षाच्या एका सभेत झणझणीत नॉनव्हेजचा बेत आखला होता. कार्यकर्ते मटण वरपण्याच्या तयारीतच होते. पण ताटात नुसता रस्सा आल्यानं मोठा राडा झाला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. यावर लोकांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.
advertisement
3/7
14 नोव्हेंबरच्या रात्री भाजपाच्या एका कार्यालयात मटण पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. याचं जवळपास हजार लोकांना निमंत्रण गेलं. त्यामुळे मोठ्या संख्येनं लोक हजर झाले होते. सगळेजण कार्यालयात बसूनच मटणाचा आस्वाद घेत होते. सगळंकाही तोपर्यंत सुरळीत होतं, जोपर्यंत खासदाराच्या ड्रायव्हरच्या भावानं पार्टीत आलेल्या एका तरुणाला फक्त रस्सा वाढला, त्यात मटणाचा एकही पीस नव्हता. मग मात्र वारं फिरलं.
advertisement
4/7
मटण खायलो बोलवलं आणि मला नुसता रस्सा दिला? या विचारानंच त्या तरुणाचं डोकं फिरलं. मग काय... त्यानं शिव्यांचा भडीमार सुरू केला. तो एवढ्यावरच थांबला नाही, त्यानं पुढं समोर दिसेल त्याला फटकवलं. विषय लाथा-बुक्क्यांवर गेला. मटण पार्टीत एकच गोंधळ उडाला. उत्तर प्रदेशच्या भदोही भागात ही घटना घडली.
advertisement
5/7
भाजपा खासदार विनोद बिंद यांच्या मिर्झापूर कार्यालयात या मटण पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं, तिथं जोरदार हाणामारी झाली. संपूर्ण कार्यक्रमात चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. शेवटी मटण पार्टी राहिली बाजूलाच.
advertisement
6/7
गोंधळ वाढतोय हे बघून काहीजणांनी गुपचूप आपली ताटं उचलून तिथून पळ काढला. ते घरी जाऊन आरामात जेवले असावेत. तर, काहीजणांनी मात्र तिथंच उभं राहून खिशातून मोबाईल काढून व्हिडीओ बनवायला सुरुवात केली.
advertisement
7/7
या घटनेचे व्हिडीओ जवळपास सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून समोर येताहेत. त्यावर नेटकऱ्यांनी कमेंटचा जणू पाऊस पाडलाय. एकानं लिहिलंय, 'यहा तो कटा भी, और बटा भी नही'.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
कटा भी और बटा भी नही? भाजपा खासदाराच्या मटण पार्टीत तुफान राडा, ताटातून नळ्याच गायब
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल