Legislative Assembly Session : राज्याच्या राजकारणाला मिळणार 'लिफ्ट'? ठाकरे-फडणवीसांच्या लिफ्ट प्रवासाचे पहिले PHOTOS
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Uddhav Thackeray Meet Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा भेट झाली. या भेटीत चर्चा झाल्याचंही पाहायला मिळालं.
advertisement
1/5

आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. याच अधिवेशनादरम्यान राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आणणारी घटना घडली.
advertisement
2/5
एकेकाळचे जवळचे मित्र आणि आताचे राजकीय प्रतिस्पर्धी असणारे दोन नेते एकत्र पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली.
advertisement
3/5
विधिमंडळात जात असताना या दोघांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला आहे. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची तीन मिनिटांची विधानभवनात लिफ्टमुळे समोर समोर भेट झाली.
advertisement
4/5
लिफ्ट बाहेर दोन्ही नेत्यांचा अडीच मिनिटं एकमेकांशी संवाद झालेला पाहायला मिळाला. दोघेही नेते लिफ्टमध्ये प्रवास करत असताना लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे यांचे स्विय साहाय्यक मिलिंद नार्वेकर, प्रविण दरेकर आणि छगन भुजबळ उपस्थित होते.
advertisement
5/5
आता लिफ्टमध्ये एकत्र जाताना दोन नेत्यांमध्ये काय संवाद झाला? यावरुन राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Politics/
Legislative Assembly Session : राज्याच्या राजकारणाला मिळणार 'लिफ्ट'? ठाकरे-फडणवीसांच्या लिफ्ट प्रवासाचे पहिले PHOTOS