Baramati : तरुणीसह चार शिकाऊ पायलटच्या कारला भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, अपघातस्थळी हादरवणारं दृश्य
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
भिगवण बारामती रोडवर लामजेवाडी जवळ मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात कारचा चक्काचूर झाला असून दोघांचा मृत्यू झाला आहे.
advertisement
1/5

बारामती भिगवण रोडवर टाटा हैरीअर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन शिकाऊ पायलट जागीच ठार तर एक अति गंभीर जखमी झाले असून आणखी एक जखमी झाला आहे.
advertisement
2/5
भिगवण बारामती रोडवर लामजेवाडी जवळ मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. चौघे शिकाऊ विमान पायलट टाटा हैरीअर गाडीतून बारामतीकडून भिगवणकडे जात होते.
advertisement
3/5
अपघातग्रस्त गाडीतील तरुणांनी मद्यपान केलं होतं अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. दारुच्या नशेत भरधाव गाडी चालवल्यानं हा अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
advertisement
4/5
अपघातात दिल्लीचा दक्षू शर्मा, मुंबईचा आदित्य कणसे यांचा मृत्यू झाला. तर राजस्थानची चेष्टा बिश्नोई आणि बिहारचा कृष्णासून सिंग हा जखमी झाला आहे.
advertisement
5/5
चेष्टाची प्रकृती गंभीर असून तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहे. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघाताची नोंद पोलिसात करण्यात आलीय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Baramati : तरुणीसह चार शिकाऊ पायलटच्या कारला भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, अपघातस्थळी हादरवणारं दृश्य