पुण्यात स्वस्तात मस्त शॉपिंग करायची आहे?, ही आहेत तुमच्यासाठी बेस्ट ठिकाणं, PHOTOS
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. तसेच पुण्यात शॉपिंगसाठी आणि फिरण्यासाठीची अनेक ठिकाणे पाहायला मिळतात. अनेक जण हे इथे खास शॉपिंग करण्यासाठी तसेच देव दर्शनासाठी येतात. तुम्हालाही पुण्यात आल्यावर अगदी स्वस्तात मस्त मस्त अशी शॉपिंग करायची असेल तर त्यासाठी नेमकी कोणती ठिकाणे आहेत, हे आपण जाणून घेऊयात. (प्राची केदारी/पुणे, प्रतिनिधी)
advertisement
1/4

फॅशन स्ट्रीट - फॅशन स्ट्रीट हे कॅम्प परिसरात गेल्यावर आपल्याला पाहायला मिळते. इथे पारंपरिक ते वेस्टर्न अशा सगळ्याच वस्तू पाहायला मिळतात. अगदी 200 रुपये पासून इथे तुम्ही खरेदी करू शकतात. अनेक दुकान याठिकाणी तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरू शकतात.
advertisement
2/4
जुना बाजार - पुण्यातील मंगळवार पेठ आणि पुढे पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर आपल्याला हा जुना बाजार पाहायला मिळतो. इथे अनेक अँटिक वस्तू बघायला मिळतात. पितळाच्या अनेक वस्तू इथे आहेत.
advertisement
3/4
हॉंगकाँग लेन - हॉंगकाँग लेन हे पुण्यातील जे. एम. रोड परिसरात पाहायला मिळते. इथे कपडे, फुटवेअर, हॅन्ड बॅग, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल कव्हर अशा वस्तूंच्या कमी किमतीमुळे हे मार्केट महाराष्ट्रभरात फेमस आहे.
advertisement
4/4
तुळशीबाग मार्केट - तुळशीबाग मार्केट हे पुण्यातील अतिशय जुने मार्केट आहे. दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला आल्यावर अनेक जण इथे आवर्जून भेट देत असतात. इथे ज्वेलरी, कपडे, चप्पल व इतर घरगुती वस्तू मिळतात. त्यामुळे पुण्यात फिरायला आल्यावर या ठिकाणाला नक्की भेट देऊ शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
पुण्यात स्वस्तात मस्त शॉपिंग करायची आहे?, ही आहेत तुमच्यासाठी बेस्ट ठिकाणं, PHOTOS