Pune Mumbai Expressway: सलग सुट्ट्यांमुळे फिरायला निघालाय? पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर 'ट्रॅफिक जॅम'! 5 KMपर्यंत वाहनांच्या रांगा
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
(गणेश दुडम,प्रतिनिधी) - Pune-Mumbai Expressway: पुणे-मुंबई एक्सप्रेसवे आणि मुंबई-गोवा महामार्गावर सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळली असून, दोन्ही प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत
advertisement
1/7

पुणे-मुंबई एक्सप्रेसवे आणि मुंबई-गोवा महामार्गावर सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळली असून, दोन्ही प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. खंडाळा घाट आणि माणगाव-इंदापूर परिसरात पर्यटकांना तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
advertisement
2/7
२६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) आणि जोडून आलेल्या शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांमुळे नागरिक मोठ्या संख्येने पुण्याकडे आणि लोणावळा-महाबळेश्वरकडे पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत.
advertisement
3/7
यामुळे पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर वाहनांचा ओघ प्रचंड वाढला असून खंडाळा घाटात ४ ते ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. विशेषतः अमृतांजन पुलाजवळ आणि घाट परिसरात वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
advertisement
4/7
दुसरीकडे, कोकणात जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमुळे मुंबई-गोवा महामार्गावरही मोठी कोंडी पाहायला मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव आणि इंदापूर शहराजवळ वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
advertisement
5/7
शनिवारपासून सोमवारपर्यंत सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या असल्याने पर्यटकांनी कोकणातील समुद्रकिनारे आणि देवदर्शनाला पसंती दिली आहे, परिणामी महामार्गावर ताण वाढला आहे.
advertisement
6/7
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महामार्ग पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी तैनात आहे. काही ठिकाणी 'ब्लॉक' देऊन वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
advertisement
7/7
प्रवाशांनी संयम राखावा आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune Mumbai Expressway: सलग सुट्ट्यांमुळे फिरायला निघालाय? पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर 'ट्रॅफिक जॅम'! 5 KMपर्यंत वाहनांच्या रांगा