KRK Arrested : हो मीच फायरिंग केली! अभिनेता कमाल खानने दिली गोळीबाराची कबुली; पोलिसांना सांगितलं कारण
- Published by:Priya Lad
Last Updated:
Actor KRK Arrested : मुंबईच्या अंधेरीतील ओशिवरा इथं झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी अभिनेता कमाल आर खान म्हणजे केआरकेला अटक केली आहे. चौकशीत त्याने गोळीबाराची कबुली देत अजब कारण सांगितलं आहे.
advertisement
1/7

अभिनेता कमाल आर खान ज्याला केआरके म्हणून ओळखलं जातं, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. कारण आहे गोळीबार. 18 जानेवारी रविवारी रात्री मुंबईच्या अंधेरीतील ओशिवरा येथील एका निवासी इमारतीवर गोळीबार झाला, या प्रकरणात त्याला अटक झाली आहे.
advertisement
2/7
लोखंडवाला येथील नालंदा इमारतीत गोळीबार झाला होता. ही इमारत परिसरातील हाय-प्रोफाइल इमारतींपैकी एक मानली जाते. इमारतीच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर दोन गोळ्या आढळल्या. एका मॉडेलच्या घरात ही गोळी घुसली. प्रतीक बेदी असं त्याचं नाव. जो त्यावेळी घरात रिहर्सल करत होता. गोळी प्रतीकच्या अगदी जवळून गेली, ज्यामुळे तो थोडक्यात बचावला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे प्रतीक आणि त्याचे कुटुंब हादरले असून, त्याने तातडीने पोलिसांकडे धाव घेतली होती. प्रतीक बेदीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी वेगाने हालचाली केल्या.
advertisement
3/7
पोलिसांनी या संपूर्ण घटनेमागे फिल्म इंडस्ट्रीचा अँगल असल्याचं म्हटलं आहे. प्राथमिक तपासात काही महत्त्वाचे दुवे हाती लागल्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा कमाल आर खानकडे वळवला. शुक्रवारी 23 जानेवारी रात्री उशिरा पोलिसांनी केआरकेला अटक केली.
advertisement
4/7
चौकशीदरम्यान केआरकेने कबूल केलं की गोळीबार त्याच्या परवानाधारक बंदुकीतून झाला होता. तो म्हणाला, आपल्या परवाना असलेल्या पिस्तुलाची साफसफाई केल्यानंतर ती चालू आहे का हे तपासण्यासाठी त्याने घरासमोरील खारफुटीच्या दिशेने गोळ्या झाडल्या, कारण तिथे मोकळी जागा आहे आणि कुणालाही धोका निर्माण होणार नाही.
advertisement
5/7
मग इमारतीत गोळी कशी घुसली, याबाबत त्याने अजब दावा केला आहे. वार्‍यामुळे गोळ्यांची दिशा बदलली आणि त्या ओशिवरा येथील निवासी इमारतीवर जाऊन लागल्या.कोणालाही इजा करण्याचा हेतू नव्हता, असं त्याने सांगितलं.
advertisement
6/7
गोळीबारात वापरलेली बंदूक पोलिसांनी जप्त केली आहे. केआरकेच्या दाव्याची सत्यता, गोळीबारादरम्यान सुरक्षा नियमांचं पालन करण्यात आलं होतं का आणि परवाना अटींचे उल्लंघन झालं होतं का याची पडताळणी आता पोलीस करत आहेत.
advertisement
7/7
पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, शस्त्राने गोळीबार करणे, मग ते जाणूनबुजून असो किंवा निष्काळजीपणे, ही एक गंभीर बाब आहे, विशेषतः जेव्हा ती निवासी क्षेत्रात घडते. त्यामुळे, बॅलिस्टिक अहवाल, घटनास्थळाची तपासणी आणि साक्षीदारांचे जबाब यासह सर्व पैलूंची चौकशी केली जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
KRK Arrested : हो मीच फायरिंग केली! अभिनेता कमाल खानने दिली गोळीबाराची कबुली; पोलिसांना सांगितलं कारण