ना मोठा बँड-बाजा, ना लाखोंची उधळण, माजी आमदाराच्या मुलीचं अवघ्या 150 रुपयांत लग्न, PHOTO
- Reported by:Pritam Pandit
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Pandharpur News: विवाहाचा खर्च विनाअनुदानित शिक्षकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत म्हणून देण्याचा निर्णय नवविवाहित दांपत्याने घेतला आहे. (प्रितम पंडित, प्रतिनिधी)
advertisement
1/7

सध्या लग्न म्हटलं की बँडबाजा आणि लाखोंची उधळण हे सर्वसामान्य बाब झाली आहे. परंतु, लग्नाचा हा ट्रेंड टाळून सोलापूर शहरात माजी शिक्षक आमदाराने मुलीचं लग्न अवघ्या 150 रुपयांमध्ये केलंय. सोलापुरात नुकतेच हा विवाह सोहळा नोंदणीकृत पद्धतीने संपन्न झाला.
advertisement
2/7
माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांची कन्या सुषमा सावंत हिचा विवाह पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेले शुभम शिंदे यांच्याशी झाला. सोलापूर जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात हा खास विवाह संपन्न साध्या पद्धतीने संपन्न झाला.
advertisement
3/7
शुभम शिंदे हे पाणीपुरवठा विभागात शासकीय अभियंता या पदावर कार्यरत आहेत. तर माजी शिक्षक आमदार यांची कन्या सुषमा सावंत यांनी भारती विद्यापीठ, पुणे येथून नुकताच मानवी शरीररचना या विषयावर पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केला आहे.
advertisement
4/7
शुभम आणि सुषमा उच्चशिक्षित असूनही विवाहातील लाखो रुपयांचा खर्च टाळून समाजासमोर एक आदर्श निर्णय घेतला. सोलापूर जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन लग्न केले.
advertisement
5/7
शुभम आणि सुषमा सावंत यांच्या या विवाह सोहळ्याला दोन्ही कुटुंबातील मोजके नातेवाईक मित्रपरिवार उपस्थित होता.
advertisement
6/7
पारंपारिक पद्धतीने विवाह केला असता तर त्यावर लाखो रुपयांचा खर्च आला असता. महत्त्वाचा म्हणजे लग्नावर होणारा खर्च टाळून 25 ते 30 लाख रुपये विनाअनुदानित शिक्षकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत म्हणून देण्याचा निर्णय नवविवाहित दांपत्याने घेतला आहे.
advertisement
7/7
नवदाम्पत्याने घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. सावंत आणि शिंदे परिवारानं घेतलेला हा निर्णय समाजासाठी एक नवा आदर्श ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/सोलापूर/
ना मोठा बँड-बाजा, ना लाखोंची उधळण, माजी आमदाराच्या मुलीचं अवघ्या 150 रुपयांत लग्न, PHOTO