Weather Alert: धरणक्षेत्रात धो धो सुरूच, पुणे ते कोल्हापूर पुन्हा अलर्ट, आजचा हवामान अंदाज
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: गेल्या काही काळात पश्चिम महाराष्ट्रातील घाट भागात जोरदार पाऊस होतोय. आज पुन्हा कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
1/7

मान्सून सक्रिय झाल्याने राज्याच्या विविध भागांत हलका ते जोरदार पाऊस सुरू आहे. आज 9 जुलै रोजी कोकण, घाटमाथा आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाटभागात जोरदार पावसाची शक्यता असून इतरत्र हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. पुढील 24 तासांचा जिल्हानिहाय हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळतो आहे. सातारा परिसरामध्ये 15 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस सुरू असून येत्या 24 तासात वक्र दरवाजे उघडण्याची शक्यता जलसिंचन विभागाने वर्तवली आहे. आज जिल्ह्यामध्ये ढगाळ आकाशासह मध्यम पावसाची शक्यता आहे. घाटमाथ्यावर मात्र मुसळधार पाऊस सुरु असून येलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
3/7
पुणे जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. धरणक्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून घाटमाथ्यावर पाऊस कोसळत आहे. मागील 24 तासात पुण्याच्या शिवाजीनगर परिसरात 0.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यावेळी कमाल तापमान 28.4 अंश सेल्सिअस राहिले. पुढील 24 तासात पुणे घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस असून दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
4/7
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. कोल्हापूर परिसरात 9 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. यावेळी कमाल तापमानात घट नोंदविण्यात आली. कमाल तापमान 25.9 अंश सेल्सिअस राहिले. आज कोल्हापूर घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
advertisement
5/7
सोलापूर जिल्हात 1 मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला. जिल्ह्यातील कमाल तापमानात वाढ होत आहे. मागील 24 तासात राज्यातील उच्चांकी 31 अंश सेल्सियस तापमानाची नोंद सोलापूरमध्ये झाली. पुढील 24 तासात कमाल तापमानाचा पारा 31 अंशावर राहणार असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
6/7
मागील 24 तासात सांगली जिल्ह्यात 2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात सांगली जिल्ह्यात ढगाळ आकाशासह मध्यम पावसाचा अंदाज आहे. यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 28 तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके राहिले.
advertisement
7/7
सततच्या ढगाळ वातावरणाने आणि अति पावसाने पश्चिम महाराष्ट्रातील शेती धोक्यात आली आहे. खरिपातील पिकांसह बागायती पिकांची वाढ देखील खुंटली असून रोगांचा धोका वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांची योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: धरणक्षेत्रात धो धो सुरूच, पुणे ते कोल्हापूर पुन्हा अलर्ट, आजचा हवामान अंदाज