TRENDING:

Weather Alert : महाराष्ट्रातून अजून पाऊस गेला नाही, बुधवारी पुन्हा वादळी पाऊस, 23 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
15 ऑक्टोबर रोजी राज्याती कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सर्व भागातील तुरळक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
1/7
महाराष्ट्रातून अजून पाऊस गेला नाही, बुधवारी वादळी पाऊस,  23 जिल्ह्यांना अलर्ट
राज्यात पावसाने काही दिवस उघडीप दिली. त्यामुळे शेतकरी शेतीची कामे करण्यात व्यस्त होते. थोडं तरी पिकं हाती लागेल ही आशा शेतकऱ्यांच्या डोळ्यात दिसून येत होती. अशातच आता वातावरणात पुन्हा एकदा बदल होताना दिसून येत आहे. 15 ऑक्टोबर रोजी राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सर्व भागातील तुरळक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाहुयात 15 ऑक्टोबर रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
2/7
मुंबईत 15 ऑक्टोबर रोजी कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर कोकण विभागातील पालघरमध्येही कोरडे वातावरण राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या सर्व जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच घाटमाथा परिसरात देखील वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
4/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या सर्व जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
5/7
धुळे, नंदुरबार या दोन जिल्ह्यांत वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर जळगाव, नाशिक या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
6/7
विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या चार जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
काही दिवस उघडीप दिल्यानंतर आता पुन्हा 15 ऑक्टोबर पासून राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेणे गरजेचे आहे. वातावरणात अचानक बदल झाल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे देखील गरजेचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रातून अजून पाऊस गेला नाही, बुधवारी पुन्हा वादळी पाऊस, 23 जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल