Weather Alert: वारं फिरलं! श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी हवामानात मोठे बदल, 10 जिल्ह्यांना यलो अलर्ट
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: राज्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी 11 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने 10 जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
1/7

गेल्या काही दिवसांत राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढला होता. आता हवामानात पुन्हा बदल जाणवत असून श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी 10 जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
2/7
11 ऑगस्ट रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत पावसाचा जोर ओसरलेला दिसून येत आहे. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र, सतर्कतेचा कोणताही इशारा नाही.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर कमी झाला आहे आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि घाटमाथा परिसर या सर्व जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर सोलापूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज आहे. सोलापूरला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
4/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली या जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. नांदेड, लातूर आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या तीन जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र, उत्तर महाराष्ट्रातील कोणताही जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा दिलेला नाही.
advertisement
6/7
विदर्भात नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या 6 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांत कुठलीही पावसाची शक्यता नाही. याठिकाणी स्वच्छ सूर्यप्रकाश बघायला मिळणार आहे.
advertisement
7/7
गेल्या तीन ते चार दिवसाच्या तुलनेत 11 ऑगस्ट रोजी राज्यातील पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून येत आहे. तरीही राज्यातील 10 जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तेथील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: वारं फिरलं! श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी हवामानात मोठे बदल, 10 जिल्ह्यांना यलो अलर्ट