Weather Alert: राज्यात गुरुवारचा दिवस मुसळधार पावसाचा, हवामान विभागाकडून अलर्ट
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पाहुयात 14 ऑगस्ट रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
1/7

पुढील काही दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
advertisement
2/7
तर कोकणमध्ये महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पाहुयात 14 ऑगस्ट रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
3/7
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहणार असून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचबरोबर कोकणातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 14 ऑगस्ट रोजी कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार काही ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यांना 14 ऑगस्टसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
4/7
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर पुणे जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्याला हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. कोल्हापूर, सातारा आणि सांगलीमध्ये मात्र काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रात अहिल्यानगर, नाशिक आणि जळगाव जिल्ह्याला हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तर धुळे, नंदुरबार आणि नाशिकच्या घाट भागावरही काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.
advertisement
6/7
तर मराठवाड्यातील सर्व आठ जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. बीड आणि जालना जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर त्याचबरोबर लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
7/7
संपूर्ण विदर्भामध्ये 14 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: राज्यात गुरुवारचा दिवस मुसळधार पावसाचा, हवामान विभागाकडून अलर्ट