TRENDING:

Weather Alert : पाऊस परत येतोय, वादळी वारे अन् विजांचा कडकडाट, पावसाचा यलो अलर्ट!

Last Updated:
विदर्भामध्ये मात्र सर्वच जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे. पाहुयात संपूर्ण राज्यामध्ये 31 मे रोजी हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
1/7
पाऊस परत येतोय, वादळी वारे अन् विजांचा कडकडाट, पावसाचा यलो अलर्ट!
संपूर्ण राज्यात दमदार बरसल्यानंतर पाऊस राज्यातून काढता पाय घेण्याच्या तयारीत आहे. निदान पुढील दोन ते तीन दिवस राज्यामध्ये कुठेही मुसळधार पावसाची शक्यता नाही.
advertisement
2/7
विदर्भामध्ये मात्र सर्वच जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे. पाहुयात संपूर्ण राज्यामध्ये 31 मे रोजी हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
3/7
मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे तर सायंकाळच्या वेळी हलक्या पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण विभागातील कोणत्याही जिल्ह्याला हवामान विभागाने पावसासाठी इशारा दिलेला नाही. मात्र कोकणात ढगाळ आकाश राहून तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो.
advertisement
4/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि साताऱ्याला हवामान विभागाने हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर इतरत्र कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
5/7
मराठवाड्यातही पावसाचा जोर ओसरणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या सर्व जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस होऊ शकतो.
advertisement
6/7
विदर्भामध्ये मात्र पावसाचा जोर कायम राहणार आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली अशा सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
7/7
त्यामुळे विदर्भामध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : पाऊस परत येतोय, वादळी वारे अन् विजांचा कडकडाट, पावसाचा यलो अलर्ट!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल