पिवळे झालेले दात चमकदार दिसण्यासाठी एक सोपी पद्धत वापरुन पाहता येईल. यामुळे पिवळेपणा जाईल आणि तुमची स्माईलही उठून दिसेल. नेहमी दातांचा पिवळेपणा लपवण्याचा प्रयत्न करत असाल तर यासाठी स्ट्रॉबेरीचा वापर कसा करायचा समजून घेऊया.
Ayurveda Tips : आयुर्वेदातील दोषानुसार ठरतं तब्येतीचं गणित, पाहूयात प्रकृती दोषानुसार कसा असावा आहार
सर्वप्रथम, दातांचा रंग निश्चित करणं आवश्यक आहे. जर नैसर्गिक रंग गडद असेल, तर तुम्ही फार काही करू शकत नाही. व्यावसायिक पद्धतीने दात पांढरे करून घेणं हा त्यावरचा उपाय आहे.
advertisement
नैसर्गिकरित्या दात पांढरे करण्यासाठी स्ट्रॉबेरी वापरणं हा एक लोकप्रिय घरगुती उपाय आहे. त्यातील मॅलिक ॲसिडमुळे दातांवरचे वरवरचे डाग तात्पुरते कमी होण्यास मदत होऊ शकते.
Time Management : कमी वेळात होतील अधिक कामं, पाच सवयींमुळे वाढेल कामांची गुणवत्ता, श्रमही वाचतील
एका पिकलेल्या स्ट्रॉबेरीचा लगदा घ्या. या लगद्यात थोडासा बेकिंग सोडा मिसळा. हे मिश्रण टूथब्रशनं किंवा बोटानं दातांना लावा. काही मिनिटं तसंच राहू द्या, नंतर स्वच्छ धुवा. यामुळे पिवळे दात पांढरे होण्यास मदत होऊ शकते.
स्ट्रॉबेरीतील आम्लामुळे दातांच्या संरक्षणात्मक थराला हानी पोहचू शकते. यामुळे इजा होऊ शकते, त्यामुळे हा उपाय दररोज करु नये. तसंच दातांवरचा पिवळेपणा जाईल पण तो तात्पुरत्या स्वरुपाचा परिणाम असेल हे लक्षात ठेवा.
दातांची समस्या बरेच दिवस असेल तर दुर्लक्ष करु नका, वेळीच दातांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
