Weather Alert: महाराष्ट्रावर रविवारी अस्मानी संकट, 23 जिल्ह्यांना अलर्ट
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्र तसेच घाट भागात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहून मुसळधार पावसाची शक्यता आहे. पाहुयात 31 ऑगस्ट रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
1/7

पुढील 24 तासात दक्षिण कोकणात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्र तसेच घाट भागात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहून मुसळधार पावसाची शक्यता आहे. पाहुयात 31 ऑगस्ट रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
2/7
मुंबई शहर आणि उपनगरात साधारणपणे ढगाळ आकाश आणि मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. संध्याकाळी आणि रात्री अधूनमधून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
3/7
मुंबईतील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे. पालघर, रायगड आणि रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे.
advertisement
4/7
त्याचबरोबर पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट भागाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगावमध्ये विजांसह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगरमध्येही तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.
advertisement
6/7
मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे.
advertisement
7/7
विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. अमरावती, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: महाराष्ट्रावर रविवारी अस्मानी संकट, 23 जिल्ह्यांना अलर्ट