Weather Alert: पुढील 24 तास धोक्याचे, राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, 23 जिल्ह्यांना अलर्ट
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. पाहुयात 12 सप्टेंबर रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
1/7

दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. तर कोकण किनारपट्टी आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये साधारणपणे ढगाळ आकाश राहणार असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. पाहुयात 12 सप्टेंबर रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
2/7
मुंबई शहर आणि उपनगरात साधारणपणे ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. मुंबई बरोबर कोकणातील जिल्ह्यांमध्ये ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता आहे. परंतु कुठेही पावसासाठी इशारा देण्यात आलेला नाही.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर सोलापूरमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगरला पावसासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर उर्वरित धुळे, नाशिक, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
advertisement
5/7
मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर धाराशिव, लातूर या जिल्ह्यांमध्ये ही विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. जालना आणि छत्रपती संभाजी नगरमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.
advertisement
6/7
संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता 12 सप्टेंबर रोजीसाठी वर्तवण्यात आली. वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये ही विजांसह जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली. विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
7/7
दरम्यान राज्यातील एकूण 23 जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भातील सगळे 11 जिल्हे, मराठवाड्यातील 6 जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातील 4 जिल्हे तर उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर एका जिल्ह्याला हवामान विभागाने पावसासाठी येलो अलर्ट जारी केलाय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: पुढील 24 तास धोक्याचे, राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, 23 जिल्ह्यांना अलर्ट