Weather Alert : महाराष्ट्रात वारं फिरलं, पारा वाढणार, हवामान खात्याचा अलर्ट
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
थंडी आता हळूहळू कमी होत असून, उन्हाळ्याच्या सुरुवातीचे संकेत दिसत आहेत. पावसाची शक्यता बहुतांश भागांत नगण्य आहे. पाहुयात 19 फेब्रुवारीला राज्यात कसं असेल हवामान.
advertisement
1/7

राज्यात पुढील काही दिवसांत किमान तापमानात 2-3 अंशांनी वाढ होईल, तर कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहील. थंडी आता हळूहळू कमी होत असून, उन्हाळ्याच्या सुरुवातीचे संकेत दिसत आहेत. पावसाची शक्यता बहुतांश भागांत नगण्य आहे. पाहुयात 19 फेब्रुवारीला राज्यात कसं असेल हवामान.
advertisement
2/7
कोकण विभागात मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये हवामान उष्ण आणि दमट राहील. मुंबईत कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअस आणि किमान 24 ते 26 अंशांच्या आसपास असेल. सकाळी हलका गारवा जाणवू शकतो, पण दुपारनंतर उकाडा वाढेल. आकाश स्वच्छ ते अंशतः ढगाळ राहील. समुद्रकिनाऱ्यावर वाहणाऱ्या समुद्री वाऱ्यांमुळे थोडासा आराम मिळेल, पण आर्द्रता जास्त असल्याने अस्वस्थ वाटेल.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमध्ये तापमानात वाढ होईल. पुण्यात कमाल 32 ते 34 अंश आणि किमान 18 ते 20 अंश राहण्याची शक्यता. रात्रीचे तापमान आता 20 अंशांपेक्षा जास्त नोंदवले जात असून, पहाटेची थंडी जवळपास नाहीशी झाली आहे. आकाश निरभ्र राहील, पाऊस नाही. शेतकऱ्यांनी रब्बी पिकांसाठी पाण्याचे नियोजन करावे.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबारमध्ये उष्णता जाणवेल. नाशिकमध्ये कमाल 32 ते 34 अंश, तर खानदेशात 34 ते 36 अंशांपर्यंत पोहोचू शकते. किमान तापमान 18 ते 22 अंश राहील. कोरड्या हवामानामुळे धुळीचे प्रमाण वाढू शकते.
advertisement
5/7
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये तापमान सर्वाधिक वाढलेले असेल. कमाल 34 ते 36 अंश आणि किमान 18 ते 21 अंश राहील. उष्ण आणि कोरडे वातावरण राहील. दुपारच्या वेळी उन्हाचा तडाखा जाणवेल.
advertisement
6/7
विदर्भात नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये उष्णता अधिक तीव्र असेल. नागपूरमध्ये कमाल 35 ते 37 अंश आणि किमान 20 ते 22 अंश राहील. हवामान कोरडे, आकाश स्वच्छ राहील. पूर्व विदर्भात थोडासा उकाडा जाणवेल.
advertisement
7/7
एकंदरीत, राज्यात उष्ण आणि कोरडे वातावरण असेल. उष्णतेच्या लाटेची शक्यता कमी असली तरी, दुपारी बाहेर पडताना सावध राहावे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रात वारं फिरलं, पारा वाढणार, हवामान खात्याचा अलर्ट