TRENDING:

Weather Alert : पुढील 24 तास मुसळधार पावसाचे, राज्यातील 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Last Updated:
पुढील 24 तासांसाठी देखील हवामान विभागाने राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना वेगवेगळे अलर्ट्स जारी केले आहेत. पाहुयात 24 मे रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
1/7
पुढील 24 तास मुसळधार पावसाचे, राज्यातील 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
मागील अनेक दिवसांपासून राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस होत असल्याचे पाहायला मिळतंय.
advertisement
2/7
पुढील 24 तासांसाठी देखील हवामान विभागाने राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना वेगवेगळे अलर्ट्स जारी केले आहेत. पाहुयात 24 मे रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
3/7
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. पालघर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये ही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
4/7
पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अहिल्यानगर आणि पुणे या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या घाट भागामध्येही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
advertisement
5/7
तर मराठवाड्यात देखील सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. लातूर, नांदेड या जिल्ह्यांना पावसासाठी ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
6/7
विदर्भामध्येही पावसाची शक्यता कायम आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तर बुलढाणा जिल्ह्याला पावसासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून बुलढाण्यामध्ये काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
advertisement
7/7
एकंदरीत राज्यांमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळत असून राज्याच्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याचे पाहायला मिळालं. हेच सत्र आता देखील सुरू असून राज्याच्या विविध भागांमध्ये जोरदार मान्सूनपूर्व पाऊस होत असल्याचं पाहायला मिळतंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : पुढील 24 तास मुसळधार पावसाचे, राज्यातील 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल