TRENDING:

ST : महाराष्ट्र एसटीची ऐतिहासिक दिवाळी; 301 कोटींचा आकडा पार करत लालपरीने रचला विक्रम

Last Updated:
Maharashtra Transport : दिवाळी हंगामात एसटी महामंडळाला तब्बल 301 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून पुणे विभागाने सर्वाधिक उत्पन्न मिळवले आहे. मात्र, अपेक्षित लक्ष गाठण्यात अपयश आल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.
advertisement
1/7
महाराष्ट्र एसटीची ऐतिहासिक दिवाळी; 301 कोटींचा आकडा पार करत लालपरीने रचला विक्रम
महाराष्ट्रात सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात नागरिक एसटीने प्रवास करत असतात. त्यात या दिवाळीच्या सुट्टीत नागरिकांन एसटीने मोठ्या प्रमाणात प्रवास केला आहे आणि त्याचाच फायदा एसटी मंहामंडळाला झाला जो की त्यांच्या उत्पन्नात भरगोस वाढ झाली आहे.
advertisement
2/7
एसटी तब्बल 301 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागाने 20 कोटी 47 लाख रुपये इतके मिळवले असून त्यानंतर धुळे विभागाला 15.60 कोटी आणि नाशिक विभागाला 15.41कोटी उत्पन्न मिळाले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी संबंधित विभागांतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे
advertisement
3/7
18 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर या दहा दिवसांच्या दिवाळी कालावधीत दररोज सरासरी 30 कोटी रुपयांचे उत्पन्न एसटी महामंडळाने मिळवले आहे. विशेष म्हणजे, 27 ऑक्टोबर या परतीच्या दिवशी एसटीला तब्बल 39 कोटी 75 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून हा या वर्षातील सर्वाधिक विक्रमी दिवस ठरला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा महामंडळाने 37 कोटी रुपयांनी जास्त उत्पन्न मिळवले असल्याचे समोर आले आहे.
advertisement
4/7
परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले की,घरापासून दूर राहून सर्वसामान्य प्रवाशांची दिवाळी गोड करण्यासाठी दिवस-रात्र सेवा बजावणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.
advertisement
5/7
एसटी महामंडळाने दिवाळी हंगामात अपेक्षित उत्पन्नाच्या दिशेने चांगली कामगिरी केली असली, तरी निर्धारित केलेले 1049 कोटी रुपयांचे ऑक्टोबर महिन्याचे लक्ष पूर्ण करण्यात महामंडळ अपयशी ठरले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात एप्रिल आणि मे वगळता गेल्या चार महिन्यांत एसटीला सातत्याने तोटा सहन करावा लागला आहे. अवकाळी पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे जून ते सप्टेंबरदरम्यान सुमारे 150 कोटी रुपयांचा तोटा झाला.
advertisement
6/7
ऑक्टोबर महिन्यात दिवाळी आणि सुट्ट्यांमुळे उत्पन्नात वाढ होईल अशी अपेक्षा होती. प्रतिदिन 34 कोटी रुपये उत्पन्नाचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. परंतु काही दिवसांखेरीज एसटीला हे दैनंदिन लक्ष्य गाठता आले नाही.
advertisement
7/7
पुणे, बीड, अहिल्यानगर, अमरावती आणि बुलढाणा या विभागांनी मागील वर्षाच्या तुलनेत या दिवाळीत चांगली कामगिरी करत उत्पन्न वाढवले आहे. परंतु सिंधुदुर्ग, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर आणि धाराशिव या विभागांची कामगिरी अपेक्षेपेक्षा सुमार राहिली. या विभागांच्या कमजोर कामगिरीचा महामंडळाच्या एकूण उत्पन्नावर विपरीत परिणाम झाल्याचे परिवहन मंत्रालयाने नमूद केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
ST : महाराष्ट्र एसटीची ऐतिहासिक दिवाळी; 301 कोटींचा आकडा पार करत लालपरीने रचला विक्रम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल