मुंबईत चहा प्या आणि ब्रेकफास्ट पुण्यात, फुडमॉलवर थांबण्याची गरज नाही, 90 मिनिटांत मुंबईहून-पुणे
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
नितीन गडकरी यांनी मुंबई पुणे प्रवास ९० मिनिटांत शक्य होईल असे जाहीर केले. अटल सेतू ते जेएनपीटी चौक जोडणारा १३० किमी ग्रीनफिल्ड हायवे आणि ५० हजार कोटींचे प्रकल्प मंजूर.
advertisement
1/6

मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी आता महत्त्वाची बातमी आहे. मुंबई पुणे प्रवासाला जवळपास अडीच ते तीन तास जातात. घाटात ट्रॅफिक असेल तर मग विचारच करू नका. मात्र आता मुंबई पुणे अंतर 90 मिनिटांत पार करता येणार आहे. झटपट जा आणि पटकन एका विरडीत काम करुन या इतक्या सुपरफास्ट प्रवास होणार आहेत.
advertisement
2/6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी विधानभवन परिसरात बोलताना मोठी घोषणा केली. येत्या वर्षभरात राज्यात दीड लाख कोटी रुपयांची विकासकामे मंजूर झाली असून, त्यातील तब्बल ५० हजार कोटी रुपयांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
advertisement
3/6
या कामांमध्ये पुणे आणि मुंबईकरांचे आयुष्य अधिक वेगवान बनवणाऱ्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी पुणे-मुंबई आणि पुढे दक्षिणेकडे जाणाऱ्या प्रवासाला नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण प्रकल्प जाहीर केला.
advertisement
4/6
पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेला जोडून एक सामायिक एक्सप्रेस हायवे तयार करण्यात येत आहे. हा ग्रीनफिल्ड लिंक अटल सेतू ते जेएनपीटी चौक ते पुणे-शिवार जंक्शन असा १३० किलोमीटरचा असेल.
advertisement
5/6
एकट्या पुणे जिल्ह्यासाठी गडकरींच्या मंत्रालयांतर्गत सुमारे ५० हजार कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत, जी येत्या तीन महिन्यांत सुरू होतील, असा दावा त्यांनी केला. यामध्ये अनेक महत्त्वाच्या एलिव्हेटेड प्रकल्पांचा समावेश आहे:
advertisement
6/6
तळेगाव-चाकण-शिक्रापूर: हा ४ हजार २०७ कोटींचा चार स्तरावरील महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यात खाली रस्ता, त्यावर दोन उड्डाणपूल आणि सर्वात वर मेट्रो मार्ग असेल. याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. हडपसर ते यवत ५ हजार २६२ कोटींचा हा प्रकल्प एलिव्हेटेड स्वरूपाचा असणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
मुंबईत चहा प्या आणि ब्रेकफास्ट पुण्यात, फुडमॉलवर थांबण्याची गरज नाही, 90 मिनिटांत मुंबईहून-पुणे