TRENDING:

Pune Politics News: पुण्याची 'आर्ची' झाली नगरसेवक, MBA अर्धवट सोडून निवडला राजकारणाचा मार्ग

Last Updated:
काल जाहीर झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांनी शहराच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला आहे. या निकालांमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती सर्वात कमी वयाच्या उमेदवारांची. याच पार्श्वभूमीवर प्रभाग 7 मधून अवघ्या 24 वर्षांच्या अंजली ओरसे यांनी मिळवलेला विजय विशेष लक्षवेधी ठरला आहे. जेन झी (Gen Z) मधील या तरुण नेत्या नव्या विचारसरणीने आणि विकासकेंद्रित दृष्टिकोनाने पुढे येत असल्याने नागरिकांमध्ये मोठी अपेक्षा निर्माण झाली आहे.
advertisement
1/5
पुण्याची 'आर्ची' झाली नगरसेवक, MBA अर्धवट सोडून निवडला राजकारणाचा मार्ग
काल जाहीर झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांनी शहराच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला आहे. या निकालांमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती सर्वात कमी वयाच्या उमेदवारांची. याच पार्श्वभूमीवर प्रभाग 7 मधून अवघ्या 24 वर्षांच्या अंजली ओरसे यांनी मिळवलेला विजय विशेष लक्षवेधी ठरला आहे.
advertisement
2/5
जेन झी (Gen Z) मधील या तरुण नेत्या नव्या विचारसरणीने आणि विकासकेंद्रित दृष्टिकोनाने पुढे येत असल्याने नागरिकांमध्ये मोठी अपेक्षा निर्माण झाली आहे. गोखले नगर परिसरातून निवडणूक लढवलेल्या अंजली ओरसे या सुरुवातीपासूनच चर्चेत होत्या. आर्ची सारखी दिसणारी उमेदवार म्हणून सोशल मीडियावर त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली होती.
advertisement
3/5
मात्र केवळ ही ओळख न राहता, प्रभागातील मूलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका मांडत त्यांनी मतदारांचा विश्वास संपादन केला. अखेर त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या असून, त्यांच्या या यशामुळे तरुण पिढीचा राजकारणातील सहभाग अधिक ठळक झाला आहे. अंजली ओरसे या सध्या सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये एमबीए (फायनान्स)चे शिक्षण घेत आहेत. त्यांचे वडील माजी नगरसेवक असल्याने राजकारणाचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे.
advertisement
4/5
वारसा महत्त्वाचा आहे, पण जनतेचा विश्वास जिंकणे अधिक महत्त्वाचे आहे, असे त्या सांगतात. प्रभागातील पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, वाहतूक, ड्रेनेज यांसारख्या मूलभूत समस्यांवर प्राधान्याने काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण प्रभागात सीसीटीव्ही बसवण्याचा, तसेच डिजिटल फ्रॉड व सायबर क्राईमसाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे.
advertisement
5/5
विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जाईल, असे त्या म्हणाल्या. आर्ची फेम अशी ओळख मिळाली असली तरी, विकास हाच माझा खरा अजेंडा आहे, असे ठामपणे सांगत अंजली ओरसे यांनी नव्या उमेदीने राजकारणात प्रवेश केला आहे. गोखले नगरसह संपूर्ण प्रभाग क्रमांक सातचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी त्या नव्या विचारांनी आणि ऊर्जेने काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune Politics News: पुण्याची 'आर्ची' झाली नगरसेवक, MBA अर्धवट सोडून निवडला राजकारणाचा मार्ग
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल