Weather Alert : महाराष्ट्रावर आता नवीन संकट, पुन्हा येतेय लाट, हवामान खात्याचा अलर्ट
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
राज्यात सध्या तापमानात चढ-उतार कायम असून काही भागांत दुपारच्या वेळी उकाडा जाणवत आहे. तर दुसरीकडे थंडीचाही प्रभाव पूर्णपणे कमी झालेला नाही. गोंदिया येथे राज्यातील नीचांकी 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
advertisement
1/7

राज्यात सध्या तापमानात चढ-उतार कायम असून काही भागांत दुपारच्या वेळी उकाडा जाणवत आहे. तर दुसरीकडे थंडीचाही प्रभाव पूर्णपणे कमी झालेला नाही. गोंदिया येथे राज्यातील नीचांकी 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुढील काही दिवस राज्यात असेच वातावरण टिकून राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पाहुयात, 18 जानेवारी रोजी राज्यातील तापमान आणि हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
2/7
कोकण विभागासह राज्यातील अनेक भागांत 18 जानेवारी रोजी हवामान मुख्यतः निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. मुंबईत ढगांचा प्रभाव नसून हवामान कोरडं राहील. दुपारच्या वेळी उकाडा जाणवण्याची शक्यता असून कमाल तापमान 31 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे. सकाळी आणि रात्री हवेत किंचित गारवा राहील, मात्र दिवसा उष्णतेचा त्रास जाणवू शकतो.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रात पहाटे थंडीचा प्रभाव जाणवणार असून त्यानंतर दिवसभर तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे शहरात सकाळच्या वेळेत धुकं पडण्याची शक्यता असून आकाश अंशतः निरभ्र राहील. येथे कमाल तापमान सुमारे 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतकं राहण्याचा अंदाज आहे. सकाळी गारवा आणि दुपारी उकाडा असा हवामानाचा अनुभव नागरिकांना येऊ शकतो.
advertisement
4/7
मराठवाडा विभागात सकाळच्या वेळेत थंड वातावरण राहणार आहे. त्यानंतर सूर्यप्रकाश वाढल्याने दुपारच्या वेळी उष्णता जाणवेल. छत्रपती संभाजीनगर येथे आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असून कमाल तापमान 32 अंश, तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतकं राहील. मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे रात्रीचा गारवा कमी झाला असून तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रातही हवामानात बदल कायम राहणार आहे. पहाटे गारवा जाणवेल, मात्र दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे. नाशिकमध्ये कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतकं राहील. काही भागांत सकाळच्या वेळेत हलकं धुकं पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
6/7
विदर्भात थंडीचा प्रभाव काही जिल्ह्यांत अधिक प्रमाणात कायम असून तापमानातील चढ-उतार सुरूच आहेत. नागपूरमध्ये हवामान मुख्यतः निरभ्र राहणार असून कमाल तापमान 31 अंश, तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे. सकाळी आणि रात्री गारवा जाणवेल, तर दुपारच्या वेळेत तापमान वाढल्याने उकाडा जाणवू शकतो. गोंदिया जिल्ह्यात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून येथे किमान तापमान 8 अंश सेल्सिअसपर्यंत घसरलं आहे.
advertisement
7/7
दरम्यान, राज्यभरात तापमानातील सततच्या बदलांमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः सर्दी, खोकला, ताप आणि अंगदुखी यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी सकाळी व रात्री उबदार कपडे परिधान करणे, थंड हवा टाळणे आणि आरोग्याची आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रावर आता नवीन संकट, पुन्हा येतेय लाट, हवामान खात्याचा अलर्ट