अॅसिड रिफ्लक्सच्या लक्षणांविषयीही माहिती करुन घ्या. जेणेकरुन, अशी लक्षणं दिसली तर, त्वरीत उपाय करता येतील आणि डॉक्टरांचा सल्ला घेता येईल. जास्त वजन किंवा लठ्ठपणा, धूम्रपान, गर्भधारणा, काही औषधांमुळेही अॅसिड रिफ्लक्सचा त्रास जाणवू शकतो.
Meditation : ध्यानधारणा करण्याचं महत्त्व, शारीरिक - भावनिक आरोग्यासाठी उत्तम
अॅसिड रिफ्लक्सची लक्षणं -
advertisement
हृदयात जळजळ: पोटातील आम्लामुळे छातीत जळजळ होते.
घशात किंवा तोंडात कडू चव: केवळ आम्लच नाही, तर कधीकधी न पचलेलं अन्न देखील घशात किंवा तोंडात परत येतं, ज्यामुळे कडू चव येते.
ढेकर येणं: कधीकधी जेवताना हवा गिळली जाते. यामुळे पचनक्रियेदरम्यान वायू तयार होतो, ज्यामुळे ढेकर येते.
छातीत दुखणं: अॅसिड रिफ्लक्सचं हे लक्षण हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता निर्माण करू शकते.
पण एक फरक आहे.
घसा खवखवणं किंवा आवाजात बदल: पोटातील आम्लामुळे देखील घसा खवखव होऊ शकतो. यामुळे आवाजातही बदल होऊ शकतात.
सतत खोकला: अॅसिड रिफ्लक्समुळे घशात काहीतरी अडकल्यासारखं वाटू शकतं, परंतु हे जास्त प्रमाणात श्लेष्मा निर्माण झाल्यामुळे होतं. यामुळे ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा लागतो आणि त्यामुळे खोकला येतो.
Suryanamaskar : सूर्यनमस्कार करा, वजन होईल कमी, राहाल फिट, जाणून घ्या आणखी फायदे
अॅसिड रिफ्लक्सवर घरगुती उपाय -
दही: दह्यामुळे अन्ननलिकेला आराम मिळतो आणि पोटासाठी देखील दही चांगलं मानलं जातं.
केळी: केळ्यातील अल्कधर्मी गुणधर्म जास्त आम्ल तयार होण्यास प्रतिबंध करतात.
दूध: दुधामुळे छातीत जळजळ होण्यापासून त्वरित आराम मिळू शकतो.
अॅसिड रिफ्लक्स कायम राहिला तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
