Pune Rain: वारे वाहणार, विजा कडकडणार, पश्चिम महाराष्ट्रात पुढील 24 तास पावसाचे!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा असल्याने नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी.
advertisement
1/7

गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. यामुळे उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला. मात्र, मागील 24 तासांपासून काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा पसरला. पाहूया पुढील 24 तासात पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमधील हवामान अंदाज काय असेल.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यात सर्वच भागात पावसाने उघडीप घेतली आहे. मागील 24 तासात पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात शून्य मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. यावेळी कमाल तापमानाचा पारा 28.5 अंश सेल्सिअस होते. पुढील 24 तासात संपूर्ण पुणे जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्‍यता आहे. कमाल तापमान 29 तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके राहील. हलक्या पावसासह आकाश साधारणपणे ढगाळ राहील. विजांच्या कडकडाटाची शक्यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे.
advertisement
3/7
सातारा जिल्ह्यात मागील 24 तासात 20 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात साताऱ्यातील कमाल तापमान 20.3 अंश सेल्सिअस राहिले. पुढील 24 तासांसाठी सातारा जिल्ह्यात सतर्कतेचा यलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने दिला आहे. यावेळी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगवान वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाची शक्यता आहे.
advertisement
4/7
कोल्हापूर जिल्ह्यात मागील 24 तासात 1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यावेळी कमाल तापमान 27.9 अंश सेल्सिअस राहिले. पुढील 24 तासात कमाल तापमान 29 अंशावर राहिल. कोल्हापूर जिल्ह्यात देखील गडगडाटी वादळासह मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी तीस ते चाळीस किलोमीटर प्रतितास वेगवान वारे असेल. पुढील चार दिवस कोल्हापूर जिल्हा सतर्कतेचा यलो अलर्ट आयएमडीने जारी केला आहे.
advertisement
5/7
सोलापूर जिल्हात मागील 24 तासात 10.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच 30.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात कमाल तापमान 31 अंशावर राहिल. तसेच पुढील 24 तासात सोलापूर जिल्ह्यात गडगडाटी वादळासह मध्यम पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे.
advertisement
6/7
मागील 24 तासात सांगली जिल्ह्यामध्ये 3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात गडगडाटी वादळासह मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 30 तर कमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके राहील.
advertisement
7/7
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाच्या उघडिपीसह तापमानात चढ-उतार सुरू आहेत. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाश राहण्याचा, तसेच तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या सरींचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच सतर्कतेचा इशारा असल्याने नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune Rain: वारे वाहणार, विजा कडकडणार, पश्चिम महाराष्ट्रात पुढील 24 तास पावसाचे!