TRENDING:

Weather Alert: ताशी 40 किमीने वारे वाहणार, पश्चिम महाराष्ट्रात आज धो धो कोसळणार, पुणे ते कोल्हापूर 5 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पुढील 24 तासांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
1/7
विजा कडाडणार, पश्चिम महाराष्ट्रात धो धो कोसळणार, 5 जिल्ह्यांना यलो अलर्ट
पावसाने उघडीप दिल्याने कमाल तापमानात वाढ झाली आहे. विदर्भात पारा पस्तिशीपार गेला असून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मात्र पावसाचा जोर आहे. घाटमाथ्यासह पश्चिम महाराष्ट्रात आज जोरदार पावसाची शक्यता असून पुणे ते कोल्हापूर 5 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
2/7
मागील 24 तासात पुणे जिल्ह्यात पावसाची उघडीप राहिली. यावेळी कमाल तापमानाचा पारा 29.2 अंश सेल्सिअसवर पोहोचला. पुढील 24 तासात पुणे आणि पुणे घाटमाथ्यावर विजांसह पावसाची शक्यता आहे. यामुळे सतर्कतेचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तसेच पुढील 24 तासात पुण्यातील कमाल तापमान 30 तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके राहील.
advertisement
3/7
सातारा जिल्ह्यात मागील 24 तासात हलका पाऊस कोसळला. सातारा परिसरामध्ये 0.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात साताऱ्यातील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस राहिल. सातारा जिल्ह्यामध्ये ढगाळ आकाश आणि विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
advertisement
4/7
कोल्हापूर जिल्ह्यात मागील 24 तासात 1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यावेळी कमाल तापमान 27.2 अंश सेल्सिअस राहिले. पुढील 24 तासात कमाल तापमान 29 अंशावर पोहचेल. तसेच विजांसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगवान वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
5/7
सोलापूर जिल्हात मागील 24 तासात पावसाची उघडीप राहिली. कमाल तापमानात वाढ होऊन पारा 34.2 अंशावर पोहचला आहे. पुढील 24 तासात कमाल तापमानाचा पारा 33 अंशावर राहण्याची शक्यता आहे. तसेच विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
advertisement
6/7
मागील 24 तासात सांगली जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात सांगली जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट हवामान विभागाने वर्तवला आहे. यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 32 तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके राहील.
advertisement
7/7
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत आकाश साधारणपणे ढगाळ राहील. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: ताशी 40 किमीने वारे वाहणार, पश्चिम महाराष्ट्रात आज धो धो कोसळणार, पुणे ते कोल्हापूर 5 जिल्ह्यांना यलो अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल