Gudi Padwa Rangoli: कमी वेळात जास्त आकर्षक; गुढीपाडव्याला अंगणाची शोभा वाढवतील 'या' सोप्या रांगोळ्या; पाहा Photo
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Gudi padwa rangoli designs: भारतात कोणताही सण उत्सव म्हटलं की रांगोळी आलीच. यंदा गुढीपाडव्याला आकर्षक रांगोळी काढायच्या विचारात असाल तर काही डिझाईन्स पाहू.
advertisement
1/5

गुढीपाडवा हा हिंदू नववर्षारंभ मानला जातो. घरोघरी गुढी उभारून हा सण साजरा केला जातो. गुढीला फुले, साखरेची माळ आणि कडुनिंबाच्या पानांनी सजवलं जातं. तसेच अंगणात सडा-रांगोळी केली जाते. गृहिणी या दिवशी आवर्जून गुढीची रांगोळी काढतात. त्यासाठी काही आकर्षक डिझाईन्स तुम्हाला नक्कीच सोपे वाटतील.
advertisement
2/5
भारतीय संस्कृतीत कायम सण आणि उत्सवांना अधिक महत्त्व असतं. काही साध्या गोष्टीचा वापर करून तुम्ही रांगोळी काढू शकता. गुढीपाडव्याचं महत्त्व अधोरेखीत करणारी आकर्षक रांगोळी काढल्यास घराचं अंगण आकर्षक वाटतं.
advertisement
3/5
गुढीपाडव्याच्या दिवशी घरात गोडाधोडाचा स्वंयपाक बनवला जातो. त्यामुळे गृहिणींना गडबडीत रांगोळी काढण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही. तेव्हा अगदी 5-10 मिनिटांत काढता येतील अशा रांगोळीच्या सोप्या डिझाईन्स निवडल्या जातात.
advertisement
4/5
पाडव्याला नवीन साडी, कडुनिंबाची पाने, साखर माळ, फुलांची माळ अशा पद्धतीने गुढी सजवली जाते. हे सगळं रांगोळीत काढल्यास अधिक आकर्षक वाटतं. तुमच्या अंगणात अशाच पद्धतीची रांगोळी काढू शकता. गुढीपाडव्याला संस्कारभारती रांगोळी हा देखील एक उत्तम पर्याय मानला जातो. मात्र त्यासाठी तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागतो. तरीही सोप्या टिप्स वापरून अशी रांगोळी देखील लगेच काढता येते.
advertisement
5/5
पाडव्याची रांगोळी सजवण्यासाठी तुम्ही दिव्यांचा वापर करू शकता. तसेच फुलेही वापरू शकता. रांगोळीचे छाप आणि रेडिमेड रांगोळी हा पर्याय देखील सध्याच्या काळात अनेक गृहिणी वापरतात. परंतु, अंगण हाताने रांगोळी काढल्यास गृहिणींना अंगण अधिक आकर्षक वाटतं आणि एक वेगळं समाधानही मिळतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Gudi Padwa Rangoli: कमी वेळात जास्त आकर्षक; गुढीपाडव्याला अंगणाची शोभा वाढवतील 'या' सोप्या रांगोळ्या; पाहा Photo