Marathi Serial : 'मी जिंकून घेईन सारं' म्हणत छवीची एंट्री आणि एकाच वेळी 5 अभिनेत्रींची एक्झिट
- Published by:Priya Lad
Last Updated:
Marathi Serial : मी जिंकून घेईन सारं ही नवी मालिका सुरू झाली, त्यातून छवी म्हणजे अभिनेत्री जान्हवी तांबट प्रेक्षकांच्या भेटीला आली. पण त्यानंतर आता जुन्या मालिकेसह 5 अभिनेत्री निरोप घेत आहेत.
advertisement
1/7

मी जिंकून घेईन सारं म्हणत छवीची एंट्री झालेली आहे. कलर्स मराठीवरील ही नवी मालिका 16 मार्चपासून सुरू झाली आहे. या मालिकेत अभिनेत्री जान्हवी तांबट छवीच्या भूमिकेत आहे. ती येताच कलर्स मराठीवरील 5 अभिनेत्रींची एकाच वेळी एक्झिट होते आहे. या अभिनेत्रींची भूमिका असणारी मालिकाही बंद होते आहे.
advertisement
2/7
कलर्स मराठीवर नव्या मालिकांची एंट्री होत आहे. जुन्या मालिका बंद होत आहेत. त्यापैकीच एक ही मालिका जी गेली दीड वर्षे सुरू आहे. सुरुवातीला ही मालिका सायंकाळी 6.30 च्या स्लॉटला होती, सध्या ती रात्री उशिरा 11 वाजता प्रसारित केली जाते.
advertisement
3/7
या मालिकेच्या शेवटच्या एपिसोडचं शूटिंग झाल्याचं सोशल मीडियावर सांगण्यात आलं आहे. 10 मार्च रोजी या मालिकेचं शूटिंग पूर्ण झालं. मालिकेतील कलाकार आणि मालिकेशी संबंधित अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. मालिकेतील अभिनेत्रीने शेवटच्या दिवसाच्या शूटिंगचे फोटोही पोस्ट केले आहेत.
advertisement
4/7
या मालिकेत 5 मैत्रिणींची स्टोरी आहे. पाच वेगवेगळ्या स्वभावाच्या मैत्रीण एकाच रूममध्ये रूममेट्स म्हणून एकत्र राहतात. पाच मैत्रिणींच्या आयुष्यातील नाट्यमय घडामोडी, त्यांची स्वप्नं आणि संकटात एकमेकींना देणारा आधार यावर ही मालिका होती.
advertisement
5/7
ऐश्वर्या शेटे (वल्लरी), विदिशा म्हस्कर (तेजा), आकांक्षा गाडे (श्वेता), शाश्वती पिंपळीकर (प्रेरणा), प्राजक्ता परब (मिथिळा) अशा 5 अभिनेत्री यात होत्या.
advertisement
6/7
ही मालिका आहे पिंगा ग पोरी पिंगा. आता ही मालिका बंद होणार म्हणजे मालिकेतील पाचही अभिनेत्रींची एक्झिट आहे. त्यांनी सगळ्या प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
advertisement
7/7
दरम्यान कलर्स मराठीवर आणखी एक नवी मालिका येणार आहे ती म्हणजे मोहिनी. जी 23 मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Marathi Serial : 'मी जिंकून घेईन सारं' म्हणत छवीची एंट्री आणि एकाच वेळी 5 अभिनेत्रींची एक्झिट