Plum Syrup : एकदा बनवा आणि संपूर्ण उन्हाळा प्या 'हे' खास सरबत! थंडगार मोजितोही मिनिटांत होईल तयार
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Plum syrup for summer drinks : उन्हाळ्यात आपण वेगवगेळी सरबतं किंवा थंड पेय पीत असतो. यासाठी बरेच लोक घरामध्ये वेगवेगळे सिरप बनवून ठेवतात. तुम्ही प्लम म्हणजेच आलू बुखाराचे सिरप बनवून ठेऊ शकता. हे बनवायला एकदम सोपं आहे. आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे आणि याची चवही उत्तम आहे.
advertisement
1/7

प्लम हे फळ पोटॅशियमने समृद्ध असते. हे फळ हृदयाची लय निरोगी ठेवण्यास, धमन्यांचा कडकपणा कमी करण्यास आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. यामुळे पक्षाघात म्हणजे पॅरालिसिसचा धोका कमी होतो.
advertisement
2/7
प्लम पचनासाठीही फायदेशीर असते. यात भरपूर फायबर असल्याने ते आतड्यांची हालचाल नियमित करण्यास आणि बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करते. शिवाय हे त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. यातील अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी त्वचा निरोगी ठेवतात. तसेच कोलेजन निर्मितीस मदत करतात आणि त्वचेचा दाह कमी करतात.
advertisement
3/7
हे प्लम सिरप बनवण्यासाठी तुम्हाला 500 ग्रॅम प्लम म्हणजेच आलू बुखारा लागतील. त्याचबरोबर 400 ग्रॅम साखर आणि एका लिंबाचा रस लागेल. एवढ्याच साहित्यात तुमचे हे प्लम सिरप तयार होईल.
advertisement
4/7
प्लम सिरप बनवण्यासाठी सर्वात आधी स्वच्छ धुवा. त्यानंतर एका पॅनमध्ये पाणी टाका आणि त्यामध्ये हे प्लम 15 मिनिटे उकळून घ्या. नंतर ते व्यवस्थित मॅश करा किंवा बारीक करा आणि त्यातल्या बिया वेगळ्या करा. यासाठी हे मिश्रण गाळणीमधून व्यवस्थित गाळून घ्या.
advertisement
5/7
गाळलेलं मिश्रण पुन्हा एका पॅनमध्ये उकळण्यासाठी ठेवा. आता यामध्ये साखर घाला आणि मिश्रण दाटसर होईपर्यंत सुमारे 6-7 मिनिटे शिजवून घ्या. आता मिश्रण थंड झाल्यावर त्यामध्ये 1 लिंबाचा रस टाका. यानंतर मिश्रण व्यवस्थित एकत्र करा आणि एका बॉटलमध्ये भरून ठेवा.
advertisement
6/7
अशाप्रकारे तुमचे हेल्दी प्लम सिरप तयार आहे. या प्लम सिरपमध्ये तुम्ही पाणी आणि बर्फाचे तुकडे टाकून 'प्लम शरबत' बनवू शकता. त्याचबरोबर यामध्ये पाण्याऐवजी सोडा आणि बर्फाचे तुकडे टाकून तुम्ही याचे एक रिफ्रेशिंग 'मोजितो' बनवू शकता. यावरून पुदिना ठेऊन सर्व्ह करा.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
Plum Syrup : एकदा बनवा आणि संपूर्ण उन्हाळा प्या 'हे' खास सरबत! थंडगार मोजितोही मिनिटांत होईल तयार