TRENDING:

Iran War: पॉवरफुल अधिकाऱ्याची हत्या, इराणचा 'सुनामी' सारखा पलटवार! तेल अवीववर १०० क्षेपणास्त्रांचा मारा, इस्रायल हादरलं

Last Updated:

Iran Attack Israel : इराणचे दिग्गज सुरक्षा नेते अली लारीजानी आणि त्यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर संतापलेल्या इराणने इस्रायलवर प्रतिहल्ला चढवला असून, मध्यपूर्वेतील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जेरुसलेम/तेहरान: अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाने आज १९ व्या दिवशी अत्यंत भीषण वळण घेतले आहे. इराणचे दिग्गज सुरक्षा नेते अली लारीजानी आणि त्यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर संतापलेल्या इराणने इस्रायलवर प्रतिहल्ला चढवला असून, मध्यपूर्वेतील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे.
पॉवरफुल अधिकाऱ्याची हत्या, इराणचा 'सुनामी' सारखा पलटवार! तेल अवीववर १०० क्षेपणास्त्रांचा मारा, इस्रायल हादरलं
पॉवरफुल अधिकाऱ्याची हत्या, इराणचा 'सुनामी' सारखा पलटवार! तेल अवीववर १०० क्षेपणास्त्रांचा मारा, इस्रायल हादरलं
advertisement

लारीजानी यांच्या हत्येने खळबळ

इस्रायलने काल केलेल्या एका धडक कारवाईत इराणचे महत्त्वाचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानी आणि त्यांच्या मुलाचा खात्मा केला. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने अधिकृतपणे या वृत्ताला दुजोरा दिला आहे. लारीजानी यांचा मृत्यू हा इराणसाठी मोठा लष्करी आणि धोरणात्मक धक्का मानला जात आहे. इराणचे सर्वोच्च नेते अय्यातुला खामेनेई यांच्या हत्येनंतर पडद्यामागून तेच सूत्र हलवत असल्याची चर्चा होती. लाजीरानी यांच्यासह त्यांचा मुलगा आणि सुरक्षा रक्षकही ठार झाल्याची माहिती IRGC नं दिली.

advertisement

१०० हून अधिक क्षेपणास्त्रांचा मारा

या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणने इस्रायलची राजधानी तेल अवीवला लक्ष्य केले. IRGC ने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी इस्रायलमधील १०० हून अधिक ठिकाणांवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला. "आमच्या नेत्याच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बलिदानाचा हा सूड आहे," असे निवेदन इराणकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.

इस्रायलची एअर डिफेन्स सिस्टिम निष्क्रिय?

advertisement

इराणने असा दावा केला आहे की, इस्रायलची अत्यंत प्रगत मानली जाणारी 'एअर डिफेन्स सिस्टम' (संरक्षण प्रणाली) हा हल्ला रोखण्यात अपयशी ठरली असून क्षेपणास्त्रांनी नेमका वेध घेतला असल्याचा दावा इराणने केला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांद्याचे दर पुन्हा कोसळले, लिंबाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

दुसरीकडे, इस्रायलने बहुतांश क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केल्याचे म्हटले आहे. मात्र, पाडलेल्या क्षेपणास्त्रांचे अवशेष (Debris) लोकवस्तीवर कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती इस्रायलने दिली आहे.

advertisement

मराठी बातम्या/विदेश/
Iran War: पॉवरफुल अधिकाऱ्याची हत्या, इराणचा 'सुनामी' सारखा पलटवार! तेल अवीववर १०० क्षेपणास्त्रांचा मारा, इस्रायल हादरलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल