ही घटना हरयाणा राज्यातील गुरुग्राममध्ये घडली आहे. गुरुग्राममधील सेक्टर ३३ मधील एका हाऊस पार्टीमध्ये १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार झाला आहे. या प्रकरणी गुरुग्राम पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत दिल्लीतून आरोपीला अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही मूळची पश्चिम बंगालची असून ती दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेत आहे. शनिवारी ती आपल्या एका मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी गुरुग्राममधील सेक्टर ३३ मधील एका फ्लॅटवर आली होती. या हाऊस पार्टीमध्ये अनेक तरुण-तरुणी सहभागी झाले होते.
advertisement
पार्टीमध्ये ओळखीचा फायदा घेतला
या पार्टीमध्ये मद्यप्राशन सुरू होते. पीडित तरुणीच्या मैत्रिणीच्या माध्यमातूनच 'दिव्यम' (वय २९) नावाचा आरोपी या पार्टीत सामील झाला होता. पार्टी सुरू असताना आणि पीडितेनं देखील मद्यसेवन केलं होतं. ती नशेत असताना आरोपीने तिच्या असहायतेचा फायदा घेतला आणि तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर पीडितेने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.
आरोपीला दिल्लीतून अटक
पीडितेच्या तक्रारीनंतर गुरुग्राम पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपी दिव्यमचा शोध सुरू केला. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे दिल्लीतून आरोपीला बेड्या ठोकल्या. सोमवारी त्याला शहर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिली. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
