TRENDING:

Raw Banana Benefits : कच्च्या केळीचे 'हे' फायदे तुम्हाला माहितीये? वजन कमी करण्यासाठीही बेस्ट, तज्ज्ञांनी दिली माहिती

Last Updated:
Raw Banana Benefits For Health : कच्ची केळी आपण सहसा भाजी किंवा चिप्स बनवण्यासाठीच वापरतो. याचे चिप्स हेल्दी पण असतात आणि चवीलाही उत्तम लागतात. कच्च्या केळीचे काही खूप चांगले फायदेही आहेत
advertisement
1/7
कच्च्या केळीचे 'हे' फायदे तुम्हाला माहितीये? वजन कमी करण्यासाठीही बेस्ट, तज्ज्ञांनी दिली माहिती
बलिया येथील शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. वंदना तिवारी यांनी कच्च्या केळीचे फायदे सांगितले आहेत. त्यांच्यामते, कच्ची केळी डायबिटीजच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामधील स्टार्च हळूहळू ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासही मदत होते.
advertisement
2/7
कच्ची केळी पचन सुधारण्यातदेखील फायदेशीर ठरू शकते. कारण यामध्ये रेझिस्टंट स्टार्च आणि सोल्युबल फायबर असतात, जे आतडे स्वच्छ करण्यास मदत करतात. कच्ची केली खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि पोट बराच वेळ हलके राहते. म्हणूनच योग्य प्रकारे कच्ची केळी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोटाच्या समस्या कमी होऊ शकतात.
advertisement
3/7
तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही कच्ची केळी तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता. कारण यामध्ये कॅलरीज कमी असतात आणि फायबरचं प्रमाण जास्त असतं. फायबरमुळे तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं, ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही. कमी खाल्ल्यामुळे वजनही कमी होण्यास मदत होऊ शकते.
advertisement
4/7
कच्च्या केळीमधील पोटॅशियम हृदयासाठी आवश्यक असते. पोटॅशियम रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करते. त्याचबरोबर कच्ची केळी हाडे आणि स्नायूंसाठी देखील अत्यंत फायदेशीर असतात. कच्च्या केळीत असलेली आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे हाडं मजबूत करण्यास मदत करतात.
advertisement
5/7
कच्ची केळी आतड्यांसाठी नैसर्गिक आधार म्हणून काम करतात. केळीमध्ये असे गुणधर्म असतात, जे आतड्यातील गुड बॅक्टेरीया वाढवतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि शरीराला संसर्गाशी लढण्याची शक्ती मिळते. म्हणूनच कच्ची केळी आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
advertisement
6/7
तुम्हीच आहारात कच्ची केळी अनेक प्रकारे सामील करू शकता. कच्च्या केळीची भाजी, चिप्स, त्यापासून बनवलेले कोफ्ते आणि आमटीसुद्धा चवीला उत्तम असते. कच्च्या केळीचे हे फायदे घेण्यासाठी ती आहारात नक्की सामील करा.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Raw Banana Benefits : कच्च्या केळीचे 'हे' फायदे तुम्हाला माहितीये? वजन कमी करण्यासाठीही बेस्ट, तज्ज्ञांनी दिली माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल