TRENDING:

Kavya Maran : ज्याच्यामुळे काव्या मारन ट्रोल झाली, त्याला काहीच फरक पडत नाही! लिलावानंतर अबरार अहमदची पहिली प्रतिक्रिया

Last Updated:

Abrar Ahmed On Kavya Maran : टेलिकॉम एशियाच्या एका अहवालात सूत्रांचा हवाला देत असं नमूद करण्यात आलं आहे की, या मुद्द्याबाबत त्यांना कोणतीही चिंता वाटत नाही. त्यामुळे अबरार याला काहीही फरक पडत नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Abrar Ahmed sunrisers leeds : क्रिकेटच्या नव्या 100 बॉल मॅचच्या द हंड्रेड लीग स्पर्धेत भारतीय फ्रेंचायझीने थेट पाकिस्तानी बॉलरला खरेदी केल्याने मोठा राडा झाला होता. काव्या मारन यांची फ्रेंचायझी असलेल्या सनरायझर्स लीड्सने पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदला बोली लावली होती. त्याला 2. 30 कोटी रुपये सनरायझर्सने मोजले होते. त्यानंतर सोशल मीडियावर मोठी टीकेची राळ उठली अन् अबरार याच्यावर टीका होऊ लागली. अशातच ज्याच्यामुळे सगळं महाभारत घडलं, त्याला काहीच फरक पडत नाही. त्याची पहिली प्रतिक्रिया समोर आलीये.
Abrar Ahmed first reaction on sunrisers leeds bid Controversy
Abrar Ahmed first reaction on sunrisers leeds bid Controversy
advertisement

कोणतीही चिंता वाटत नाही

पाकिस्तान क्रिकेट मंडळ किंवा अबरार या दोघांपैकी कोणीही या प्रकरणावर अद्याप अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, टेलिकॉम एशियाच्या एका अहवालात सूत्रांचा हवाला देत असं नमूद करण्यात आलं आहे की, या मुद्द्याबाबत त्यांना कोणतीही चिंता वाटत नाही, कारण हा इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ (ECB) आणि संबंधित फ्रँचायझी यांच्यातील अंतर्गत बाब आहे. त्यामुळे अबरार याला काहीही फरक पडत नाही, असं म्हटलं आहे.

advertisement

अबरार अहमद द हंड्रेड लीग खेळण्याबाबत शंका

एकीकडे भारतीय संघ हँडशेकही करत नाही, त्यांच्या हातून ट्रॉफी घेत नाही. अशा स्थितीत पाकिस्तानी खेळाडू कसा काय? संघात घेतला असा प्रश्न क्रीडाप्रेमी विचारू लागले आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानी आपली नाकपुडी ताणायला सुरूवात केलीये. अबरार अहमद द हंड्रेड लीग खेळण्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. कारण, पाकिस्तान संघाचं क्रिकेट वेळापत्रक... पाकिस्तानी खेळाडू पैसे घेऊन पाकिस्तानसाठी खेळावेत, यासाठी पीसीबीने नवा प्लॅन रचलाय.

advertisement

काव्या मारनने पाकिस्तानी अबरारला टीममध्ये का घेतलं? सनरायझर्सच्या हेड कोचने BCCI वर फोडलं खापर! काय म्हणाला?

पाकिस्तानचा वेस्ट इंडिज दौरा

इंग्लंडमध्ये द हंड्रेड लीग स्पर्धेचं आयोजन होतं, त्याचवेळी पाकिस्तानचा वेस्ट इंडिज दौरा आहे. या दौऱ्यात पाकिस्तानचा संघ कसोटी मालिका खेळणार आहे. द हंड्रेड 2026 स्पर्धा 21 जुलैला सुरू होईल आणि 16 ऑगस्टपर्यंत असणार आहे. तर पाकिस्तानचा वेस्ट इंडिज दौरा 15 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे.

advertisement

बीसीसीआयची भूमिका काय?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांद्याचे दर पुन्हा कोसळले, लिंबाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

दरम्यान, या प्रकरणात बीसीसीआयची भूमिका देखील महत्त्वाची आहे. सनरायझर्सने जे काही केलं असेल तर ते आमच्या आयपीएलमध्ये केलं नाहीये. त्यांनी जे काही केलं आहे ते बाहेरच्या लीगमध्ये केलं आहे, असं राजीव शुक्ला म्हणाले. ज्यांनी जो काही निर्णय घेतला असेल तो आमच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. कारण ते आयपीएलमधील निर्णय नाहीये. त्यांनी परदेशी लीगमध्ये त्यांनी लिलाव केला आहे, असंही राजीव शुक्ला म्हणालेस होते.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Kavya Maran : ज्याच्यामुळे काव्या मारन ट्रोल झाली, त्याला काहीच फरक पडत नाही! लिलावानंतर अबरार अहमदची पहिली प्रतिक्रिया
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल