TRENDING:

Weather Alert: विजांच्या कडकडाटात अवकाळी झोडपणार, पश्चिम महाराष्ट्राला अलर्ट, आजचा हवामान अंदाज

Last Updated:
Weather Update: पश्चिम महाराष्ट्रावर अवकाळी संकट घोंघावत आहे. पुढील 24 तासांसाठी काही भागात हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
1/7
विजांच्या कडकडाटात अवकाळी झोडपणार, पश्चिम महाराष्ट्राला अलर्ट, आजचा हवामान अंदाज
राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असून आज काही भागात अवकाळी संकटाची शक्यता आहे. तर काही भागात उष्ण आणि दमट वातावरण असणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील हवापालट झाली असून आज काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
पुण्यातील तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. मागील 24 तासांमध्ये 39.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज 15 एप्रिल रोजी कमाल तापमान 40 तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस राहिल. दुपारपर्यंत निरभ्र राहिलेले आकाश दुपारनंतर मात्र अंशतः ढगाळ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
3/7
सातारा जिल्ह्यात अंशतः ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी गडगडाटी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मागील 24 तासात साताऱ्यात 39.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर पुढील 24 तासांत कमाल तापमान 39 अंश तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहिल.
advertisement
4/7
सांगली जिल्हामध्ये उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. पुढील 24 तासात कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस राहिल तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके असेल. जिल्ह्याच्या तापमानात आज बदल जाणवत असून आकाश अंशतः ढगाळ राहून गडगडाची पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यात विजांसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
5/7
कोल्हापूर जिल्ह्यातील कमाल तापमान 39 अंश तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके राहील. विजांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी पुढील 48 तास ढगाळ हवामानाची स्थिती राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
6/7
सोलापूर जिल्ह्यातील तापमानातील वाढ कायम असून कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस इतके राहील. दिवसभरच्या वाढत्या तापमानासह अंशतः ढगाळ वातावरण आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच वादळी वारे विजांसह पावसाची शक्यता असल्याने पुढील 24 तास सोलापूर जिल्ह्यासाठी अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
7/7
मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. ही प्रणाली पोषक ठरत असल्याने राज्याच्या विविध भागात अशतः ढगाळ आकाशासह वादळी पाऊस हजेरी लावत आहे. मध्य महाराष्ट्रतील तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: विजांच्या कडकडाटात अवकाळी झोडपणार, पश्चिम महाराष्ट्राला अलर्ट, आजचा हवामान अंदाज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल