TRENDING:

आजचं हवामान: पश्चिम महाराष्ट्रावर दुहेरी संकट, 48 तास धोक्याचे, या जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
Weather Update: गेल्या काही काळात राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात देखील वादळी पावसाचा अंदाज आहे.
advertisement
1/6
आजचं हवामान: पश्चिम महाराष्ट्रावर दुहेरी संकट, 48 तास धोक्याचे
गेल्या काही दिवसांत हवामानात मोठे बदल जाणवत असून गारपिटीसह अवकाळी संकट घोंघावत आहे. राज्यात अवकाळी पावसाने धुमाकुळ घातला असून काढणीला आलेल्या रब्बी पिकांना चांगलाच फटका बसत आहे. त्यातच महाराष्ट्रारातील अनेक जिल्ह्यांत गारपिट होण्याचा अंदाज असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
advertisement
2/6
राज्यात येत्या 24 तासांत वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 45 किमी इतका असेल. गुरुवारी ब्रह्मपुरी येथे उच्चांकी 38.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मालेगाव, चंद्रपूर, धुळे, जेऊर, सोलापूर येथे 38 अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. पिंपरी- चिंचवड शहरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पुढील 24 तासांतील हवामान आणि तापमान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
3/6
पुण्यात आज 4 एप्रिल रोजी कमाल तापमान 36 तर किमान 22 अंश सेल्सिअस राहिल. तसेच वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे. तर सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान 38 अंश तर किमान 25 अंश सेल्सिअस इतके राहील. दिवसभरच्या वाढत्या तापमानासह ढगाळ वातावरण आणि विजांच्या कडकडाटात आज पावसाची शक्यता आहे.
advertisement
4/6
सातारा जिल्ह्यातील कराडसह बहुतांश परिसरास वीज, वाऱ्यासह गारांच्या पावसाने झोडपले आहे. आज देखील साताऱ्यात पावसाचा यलो अलर्ट असून कमाल तापमान 36 तर किमान 23 अंश सेल्सिअस इतके राहील. पुढील एक आठवडाभर सातारा जिल्ह्यातील तापमान वाढत राहणार असल्याचा अंदाज आहे.
advertisement
5/6
सांगली जिल्हात ढगाळ वातावरण असून सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज जिल्ह्यातील कमाल तापमान 37 तर किमान 24 अंश सेल्सिअस इतके राहील. तसेच मध्यम पावसासह गडगडाटी वादळाची शक्यता आहे.
advertisement
6/6
[caption id="attachment_1369906" align="aligncenter" width="1080"] कोल्हापूर जिल्ह्यातील कमाल तापमान 35 अंश तर किमान 25 अंश सेल्सिअस इतके राहील. विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाचा अंदाज आहे. तसेच शुक्रवारपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे.</dd> <dd>[/caption]
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
आजचं हवामान: पश्चिम महाराष्ट्रावर दुहेरी संकट, 48 तास धोक्याचे, या जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल