आजचं हवामान: पश्चिम महाराष्ट्रावर आस्मानी संकट, 4 जिल्ह्यांना अलर्ट, पुण्यात काय स्थिती?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Weather Update: पश्चिम महाराष्ट्रावर आज अवकाळी संकट घोंघावत आहे. सोलापूर, कोल्हापूरसह 4 जिल्ह्यांना हवामान विभागाने अलर्ट दिला आहे.
advertisement
1/7

पावसाला पोषक हवामान असले तरी राज्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. आज 16 एप्रिल रोजी विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील हवामानात मोठे बदल जाणवत असून पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
आज पश्चिम महाराष्ट्रातील सरासरी तापमान 19.6 ते 42.2 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. पुण्यातील तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. मागील 24 तासांमध्ये 40.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज 16 एप्रिल रोजी कमाल तापमान 40 तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस राहिल. तर आकाश निरभ्र राहील.
advertisement
3/7
सातारा जिल्ह्यात अंशतः ढगाळ वातावरणासह विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे. मंगळवारी साताऱ्यात 40.3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर पुढील 24 तासांत कमाल तापमान 41 अंश तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस राहिल.
advertisement
4/7
सांगली जिल्हामध्ये उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. पुढील 24 तासात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस राहिल तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके असेल. जिल्ह्याच्या तापमानात काही बदल जाणवत असून आकाश अंशतः ढगाळ राहून एक-दोन वेळा गडगडाटी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
advertisement
5/7
कोल्हापूर जिल्ह्यातील कमाल तापमान 39 अंश तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतके राहील. विजांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पुढील 48 तास ढगाळ हवामानाची स्थिती राहील.
advertisement
6/7
सोलापूर जिल्ह्यातील तापमानातील वाढ कायम असून कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके राहील. दिवसभरच्या वाढत्या तापमानासह अंशतः ढगाळ वातावरण आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच वादळी वारे विजांसह पावसाची शक्यता असल्याने पुढील 24 तास सोलापूर जिल्ह्यासाठी अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
7/7
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या 4 जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तापमानासह बदलत्या हवामानात शेतकऱ्यांनी पिकाची अन् आरोग्याची काळजी घेणे गरजेचे ठरते आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
आजचं हवामान: पश्चिम महाराष्ट्रावर आस्मानी संकट, 4 जिल्ह्यांना अलर्ट, पुण्यात काय स्थिती?