TRENDING:

आजचं हवामान: सावधान! 10 ते 4 बाहेर पडू नका, पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेची लाट, 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Last Updated:
Weather Update: पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढला असून सूर्य आग ओकत असल्याचे चित्र आहे. पुढील 24 तासांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/7
10 ते 4 बाहेर पडू नका, पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेची लाट, 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट
राज्यातील काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानाने नागरिक हैराण आहेत. शुक्रवारी अकोला येथे राज्यातील उच्चांकी 44.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अन्य 11 जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात 42 अंश अधिक तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामानाच्या अंदाजासह यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज 19 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील सरासरी तापमान 20.3 ते 42.8 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस इतके राहील.
advertisement
3/7
सांगली जिल्हामध्ये उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. पुढील 24 तासात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस राहिल तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस इतके असेल. आकाश निरभ्र राहणार असून वाढत्या उष्णतेमुळे पिकांची काळजी घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे.
advertisement
4/7
कोल्हापूर जिल्ह्यातील तापमानात अंशतः घट दिसून येते. कमाल तापमान 39 अंश तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके राहील. मागील 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात 37 अंश कमाल तापमानाची नोंद झाली आहे. पुढील 24 तासात आकाश निरभ्र राहील.
advertisement
5/7
पुणे जिल्ह्यातील तापमान 41 अंशावर गेले असून नागरिकांना दक्षतेचे आवाहन करण्यात आलेय. मागील 24 तासांमध्ये 40.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात कमाल तापमान 40 तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस राहिल. आज आकाश निरभ्र राहील.
advertisement
6/7
साताऱ्यात शुक्रवारी 40.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर पुढील 24 तासांत कमाल तापमान 41 अंश तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहिल.
advertisement
7/7
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत तापमानात मोठी वाढ झालीये. त्याचा फटका फळबागांना बसत असून शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल. तसेच वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका असून नागरिकांनी आरोग्याची देखील काळजी घेण्याची गरज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
आजचं हवामान: सावधान! 10 ते 4 बाहेर पडू नका, पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेची लाट, 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल