सोलापूर आणि सांगलीमध्ये तापमानाचा पारा चढला, पुढील 24 तासांत आणखी वाढ होणार का? पाहा हवामान अपडेट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात अजूनही वाढ कायम आहे. पुढील 24 तासांत पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात आणखी वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
advertisement
1/7

राज्यातील तापमानात गेल्या काही दिवसांत चांगलीच वाढ झालेली दिसून येत आहे. कोकणसह आता विदर्भातही उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात देखील दिवसेंदिवस वाढ दिसून येत आहे. सोलापूर आणि सांगलीतील तापमानात चांगलीच वाढ बघायला मिळत आहे. पाहुयात आज 12 मार्चला पश्चिम महाराष्ट्रातील इतर शहरांत तापमान आणि हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
2/7
पुण्यातील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुण्यातील तापमानात मंगळवारच्या तुलनेत 2 अंशांनी वाढ झालेली दिसून येत आहे. पुण्यात आज मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं.
advertisement
3/7
साताऱ्यातील कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. साताऱ्यात आज मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं. तेथील तापमानात अंशतः वाढ झाली असून पुढील 24 तासांत अंशतः घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
advertisement
4/7
सांगलीतील कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. सांगलीत आज मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं. तेथील तापमानात अंशतः वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
advertisement
5/7
सोलापूरमधील तापमानात वाढ होऊन तेथील कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. सोलापूरमध्ये आज मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं. सोलापुरातील तापमानात पुढील 24 तासांत आणखी वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
advertisement
6/7
कोल्हापुरमधील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये आज मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं. तेथील तापमानात अंशतः वाढ झालेली दिसून येत आहे. पुढील काही दिवसांत तेथील तापमानात आणखी 2 अंशांनी वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
advertisement
7/7
पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. सोलापूरमधील कमाल तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता असल्यानं तेथील नागरिकांनी उन्हापासून स्वतःचे संरक्षण करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पिकांची देखील योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
सोलापूर आणि सांगलीमध्ये तापमानाचा पारा चढला, पुढील 24 तासांत आणखी वाढ होणार का? पाहा हवामान अपडेट