आजचं हवामान: पुन्हा वादळी पाऊस, कोल्हापूरसह 3 जिल्ह्यांना अलर्ट, पुण्यात काय स्थिती?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Weather Update: एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यावर आस्मानी संकट घोंघावत आहे. आज पश्चिम महाराष्ट्रातील हवामान आणि तापमान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
1/7

ढगाळ हवामान, अवकाळी पावसाची हजेरी यामुळे राज्याच्या कमाल तापमानात मोठी घट झाली आहे. तापमानाचा पारा 38 अंशावर त्यापेक्षा खाली घसरला आहे. आता पुन्हा हवापालट होऊन तापमान वाढण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांतील हवामान आणि तापमान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
2/7
सोलापूर येथे शुक्रवारी उच्चांकी 38.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज आकाश ढगाळ राहून गडगडाटासह मध्यम पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस इतके राहील.
advertisement
3/7
पुण्यातील हवामानात चढ-उतार होतील. आज 5 एप्रिल रोजी कमाल तापमान 39 तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस राहिल. अधूनमधून पाऊस आणि तापमानात वाढ होईल.
advertisement
4/7
सातारा जिल्ह्यातील बहुतांश परिसरास वीज, वाऱ्यासह पावसाने झोडपले आहे. आज किमान तापमान 36 तर कमाल 23 अंश सेल्सिअस इतके राहील. पुढील एक आठवडाभर सातारा जिल्ह्यातील तापमान वाढत राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
5/7
सांगली जिल्हातील जत तालुक्यात शुक्रवारी 40 मिलिमीटर अवकाळी कोसळला. तर पलूस, कवठेमहांकाळ व शिराळा तालुक्यात 10 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज देखील सांगली जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट असून तापमानात वाढ होत आहे. आज सांगली जिल्ह्यातील कमाल तापमान 37 तर किमान 22 अंश सेल्सिअस इतके राहील.
advertisement
6/7
कोल्हापूर जिल्ह्यातील कमाल तापमान 37 अंश तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके राहील. विजांच्या गडगडाटास मध्यम पावसाचा अंदाज आहे.
advertisement
7/7
आज पश्चिम महाराष्ट्रातील कमाल तापमान 38.5 तर किमान तापमान 14.5 अंश सेल्सिअस राहील. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
आजचं हवामान: पुन्हा वादळी पाऊस, कोल्हापूरसह 3 जिल्ह्यांना अलर्ट, पुण्यात काय स्थिती?