Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात वारं फिरलं, सोलापुरात पुन्हा धो धो कोसळणार, IMD कडून महत्त्वाचं अपडेट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. येत्या 2 दिवसांत पाऊस पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता असून सोलापुरात हवामानाची विचित्र स्थिती आहे.
advertisement
1/7

सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात मुसळधार पावसाने कहर केला. आता ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आज 2 ऑक्टोबर रोजी विदर्भ आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रासह राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या सरींचा अंदाज आहे. पुणे ते कोल्हापूर जिल्हानिहाय हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात बुधवारी 0.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यावेळी 28.7 अंश सेल्सिअस कमाल तापमान राहिले. आज विजयादशमीच्या दिवशी पुणे जिल्ह्यासह घाटमाथ्यावर ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्‍यता आहे. 48 तासानंतर पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
3/7
गेल्या 24 तासात सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान 27.8 अंश सेल्सिअस इतके राहीले. वादळी वाऱ्यासह 0.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज संपूर्ण साताऱ्यासह सातारा घाटमाथ्यावर ढगाळ आकाशासह मध्यम पावसाची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
advertisement
4/7
कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी 3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज जिल्ह्यातील कमाल तापमान 25.7 अंशावर राहिल. तर पुढील 24 तासात कोल्हापूरसह घाटमाथ्यावर ढगाळ आकाशासह मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
5/7
सोलापूर जिल्ह्यात मागील 24 तासात 0.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पाऊस कमी होताच तापमानात वाढ झाली आहे. 1 ऑक्टोबर रोजी 31.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज एक दोन वेळा गडगडाटासह पावसाची शक्यता असून आकाश साधारणपणे ढगाळ राहील. शुक्रवारपासून सोलापुरात पुन्हा पावासाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
6/7
सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात तुरळक ठिकाणी 1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यावेळी कमाल तापमान 28.2 अंश सेल्सिअस इतके राहिले. पुढील 24 तासात जिल्ह्यात अंशत: ढगाळ आकाशासह एक दोन वेळा गडगडाटाची पावसाची शक्यता आईएमडीने व्यक्त केली आहे.
advertisement
7/7
पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होऊन पहाटे धुके तर दिवसभर रिमझिम पावसासह कडक ऊन असे मिश्र हवामान झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता असून काही ठिकाणी ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची नोंद होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात वारं फिरलं, सोलापुरात पुन्हा धो धो कोसळणार, IMD कडून महत्त्वाचं अपडेट