TRENDING:

Weather Alert: पुणे ते कोल्हापूर धो धो कोसळणार, पश्चिम महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना हायअलर्ट

Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढली आहे. आज पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटभागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
1/5
पुणे ते कोल्हापूर धो धो कोसळणार, पश्चिम महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना हायअलर्ट
पावसाने पुन्हा महाराष्ट्र व्यापायला सुरुवात केली आहे. राज्यातील 23 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत चालला आहे. आज पुन्हा विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील 29 ऑगस्टचा हवामानाचा अंदाज जाणून घेऊ
advertisement
2/5
पुण्यातील घाट परिसरात आज पुन्हा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, उर्वरित पुणे जिल्ह्यासाठी कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. तसेच, 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे.
advertisement
3/5
सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात पुढील 24 तासांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
4/5
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. राधानगरी धरणाच्या नदीपात्रातील पाण्याची पातळीही वाढली आहे. कोल्हापूर जिल्ह्यासह घाटमाथ्याच्या भागात पुढील 24 तासांसाठी यलो देण्यात आला आहे. या काळात जोरदार वारे आणि विजांसह पावसाची शक्यता आहे.
advertisement
5/5
सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांसाठी कोणताही विशेष अलर्ट देण्यात आला नाही. या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील काही काळ अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: पुणे ते कोल्हापूर धो धो कोसळणार, पश्चिम महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना हायअलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल