3 राशींचं नशीब पार उजळलंय! अक्षय्य तृतीयेला लक्ष्मी-नारायणाचा आशीर्वाद मिळालाय
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
10 मे रोजी जेव्हा सर्वत्र अक्षय्य तृतीया साजरी होत असतानाच ग्रहांचा राजकुमार मानला जाणारा बुध ग्रह मेष राशीत प्रवेश करेल. जिथं शुक्र आधीपासून अस्त अवस्थेत विराजमान आहे. म्हणजेच या राशीत बुध आणि शुक्राची युती होईल. अर्थातच यातून निर्माण होणारा लक्ष्मी-नारायण योग अत्यंत लाभदायी असेल. त्याचा सर्वाधिक लाभ कोणाला मिळणार, जाणून घेऊया ज्योतिषांकडून. (शुभम मरमट, प्रतिनिधी / उज्जैन)
advertisement
1/5

ज्योतिषी रवी शुक्ला यांनी सांगितलं की, लक्ष्मी-नारायण योगाचा सकारात्मक प्रभाव आपल्या कुंडलीवर पडला की, आपला मान-सन्मानही आपसूक वाढतो. इतकंच नाही, तर करियरमध्ये यश मिळतं. कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण होतं. कोणत्याही अडचणीतून बाहेर निघण्याचा मार्ग मिळतो. आता निर्माण होणाऱ्या योगाचा सर्वाधिक लाभ 3 राशींच्या व्यक्तींना मिळेल, असं ज्योतिषी म्हणाले.
advertisement
2/5
वृषभ : आपल्यासाठी हा सण अत्यंत लाभदायी ठरण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या आर्थिक अडचणी आता मूळासकट संपतील. आपल्या कुटुंबियांना कसलीच कमतरता भासणार नाही, ज्यामुळे आपलं मन तणावमुक्त राहिल. नोकरीत विशेष लाभ मिळेल. लक्ष्मी देवीच्या कृपेने प्रचंड धनलाभ होईल.
advertisement
3/5
मिथुन : आपल्यासाठी लक्ष्मी-नारायण योग प्रचंड लाभदायक असेल. आपलं उत्पन्न वाढेल. नोकरीतही सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. मागील बऱ्याच काळापासून अडकलेले आपले पैसे आता आपल्याला परत मिळतील. विशेष म्हणजे या काळात भरपूर बचत होईल, शिवाय गुंतवणुकीतूनही चांगला नफा मिळेल. एखादं मोठं प्रोजेक्ट आपल्याला मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
4/5
सिंह : आपल्यावरही राजयोगांचा <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/do-not-do-these-3-activities-on-akshaya-tritiya-you-will-lose-l18w-mhij-1178637.html">सकारात्मक</a> प्रभाव पडणार आहे. करियरमध्ये यश मिळेल. विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन लागेल. स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/akshaya-tritiya-2024-there-is-no-shubh-muhurta-for-the-wedding-on-this-day-l18w-mhij-1178539.html">यश</a> मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्येही यश मिळू शकतं. अविवाहितांना आता लग्नासाठी एक उत्तम स्थळ येईल. एकूणच आपल्या वाटचं सुख आता वाढलंय.
advertisement
5/5
सूचना : येथे दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/">धार्मिक</a> श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
3 राशींचं नशीब पार उजळलंय! अक्षय्य तृतीयेला लक्ष्मी-नारायणाचा आशीर्वाद मिळालाय