साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी तसेच फास्ट-ट्रॅक विवाह नोंदणी सुरू करणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका आहे. या सेवा अंतर्गत मिळणारे विवाह नोंदणी प्रमाणपत्र क्यूआर कोडसह उपलब्ध होणार आहे. लवकरच डिजिलॉकर सुविधेतही या विवाह नोंदणी प्रमाणपत्राचा समावेश होणार आहे.
कॅनरा बँकेत 3500 जागांसाठी भरती, थेट मुलाखतींतूनच होणार निवडप्रक्रिया; अर्जाची लिंक बातमीत
advertisement
विवाह नोंदणीची प्रक्रिया अधिक जलद, आधुनिक व सुलभ करण्याच्या उपक्रमातील एक महत्त्वपूर्ण टप्पा हा ऑनलाईन सुविधा प्रक्रियेचा आहे. नागरिकांसाठी तंत्रज्ञान स्नेही तसेच वेळेची बचत करणाऱया सुविधा उपलब्ध करून देतानाच, ऑनलाईन सुविधांमध्ये सातत्य राखण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी केले आहे. विवाह नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देत, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, विवाह जोडप्यांचे छायाचित्र इत्यादी सेवा थेट ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध झाल्या आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने याआधीच दिनांक 21 सप्टेंबर 2025 पासून सार्वजनिक सुटी वगळून साप्ताहिक सुटीच्या दिवशी म्हणजे शनिवार, रविवार या दिवशी विवाह नोंदणी सेवा सुरू राहणार आहे. तर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सोमवार ते शुक्रवार) जलद विवाह नोंदणी (फास्टट्रॅक) सेवा सुरू केली आहे.
मध्य रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक; भायखळा- सायन स्थानक दरम्यान पायाभूत कामासाठी ब्लॉक
विवाह नोंदणी सेवेची मुख्य वैशिष्ट्ये:
1. साप्ताहिक सुट्टीतील आणि जलद नोंदणी: नागरिक आता शनिवारी व रविवारी विवाह नोंदणीसाठी नियोजन करू शकतील. तातडीच्या गरजेसाठी, विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र त्याच दिवशी मिळण्याकरिता ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सोमवार ते शुक्रवार) २० टक्के विवाह नोंदणी सेवा ही ‘फास्टट्रॅक’ म्हणून राखीव राहणार आहे.
2. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू:
जलद नोंदणी आणि साप्ताहिक सुट्टीतील विवाह नोंदणीची ऑनलाइन प्रणाली आता पूर्णत्वास आली आहे. अर्जदार महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरून पूर्णपणे ऑनलाइन अर्ज करू शकतील. पोर्टल लिंक- https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlmarriagetab?guest_user=english शनिवारी- रविवारी विवाह नोंदणी इच्छुकांना करण्यासाठी वेळ प्राप्त करण्यासाठी (Appointment), ऑनलाइन अर्ज हा Appointment दिनांकाच्या अगोदरच्या दिवशी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत करता येईल. या वेळेनंतर सादर केलेले अर्ज त्या साप्ताहिक वेळ नोंदणी (Appointment) करिता विचारात घेतले जाणार नाहीत. जलद विवाह नोंदणीचे अर्ज त्याच दिवशी प्रक्रियेसाठी ऑनलाइन सादर करता येतील.
सीनाची पाणीपातळी कमी, 48 तासानंतर सोलापूर- विजयपूर महामार्ग अखेर सुरू, Video
3. शुल्क रचना:
साप्ताहिक सुटीतील आणि जलद विवाह नोंदणी सेवांसाठी नियमित शुल्क अधिक रुपये २,५००/- इतके अतिरिक्त शुल्क लागू असेल. हे शुल्क महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन भरता येतील.
4. नागरिकांच्या सुविधेसाठी शासनाकडून धोरणात्मक सुधारणा:
विवाह ठिकाण हे जर महाराष्ट्रातील असेल, तरच महानगरपालिकेकडे विवाह नोंदणी करता येत होती. परंतु, ही अट आता काढून टाकण्यात आली आहे. सबब, सद्यस्थितीत, जगातील कोणत्याही ठिकाणी विवाह झालेले जोडपे यांच्यापैकी कोणीही एक व्यक्ती, ज्या विभागात राहत असतील, त्या महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभागामध्ये विवाह नोंदणी करू शकतात.
5. धार्मिक कक्षा रुंदावली:
याआधी, महानगरपालिकेच्या कार्यालयात हिंदू, मुस्लीम, बौद्ध, शीख, जैन धर्मीय या जोडप्यांची विवाह नोंदणी करण्यात येत होती. तथापि, आता, ख्रिश्चन, ज्यू आणि पारशी यांसारख्या सर्व धर्मांच्या समान धर्मीय जोडप्यांनाही विवाह नोंदवण्याची सुविधा देण्यात आली आहे.
शीख विवाह: शीख जोडप्यांसाठी वरील पर्याया व्यतिरिक्त, आनंद विवाह अधिनियम, १९०९ अंतर्गत नोंदणी अर्जाकरिता, आता महानगरपालिका संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध आहे.
सर्व विवाह नोंदणीकरिता, ऑनलाईन अर्ज करून, प्रत्यक्ष पडताळणी नंतर, विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे संबंधितांच्या ईमेल (Email) वर पाठविले जाणार आहे.
नवी मुंबई विमानतळाला मुहूर्त मिळाला, PM मोदींच्या हस्ते उद्घाटन, तारीख ठरली
5. डिजीलॉकर सुविधेत समावेश होणार
विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे आता ‘क्यूआर कोड’ (QR Code) सहित देण्यात येत आहे. सबब,त्वरित पडताळणीकरिता उपलब्ध असल्यामुळे, भविष्यात डिजीलॉकर सुविधेमध्ये त्याचा समावेश होऊ शकेल.
अर्जदारांसाठी महत्त्वाची सूचना:
१) कागदपत्रे पूर्ण करण्यासापेक्ष, जलद नोंदणी योजने अंतर्गत, नोंद करणाऱया विवाहांचे नोंदणी प्रमाणपत्र त्याच दिवशी दिले जाईल.
२) ऑनलाईन प्रणाली पूर्णपणे सुरू झाल्यामुळे, प्रशासकीय विभाग (वॉर्ड) कार्यालयांकडे हाताने अर्ज सादर करण्याची तात्पुरती प्रक्रिया बंद करण्यात आली आहे.
३) दर शनिवारी महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांपैकी - ए, सी, ई, एफ दक्षिण, जी दक्षिण, एच पूर्व, के पूर्व, पी दक्षिण, पी उत्तर, आर मध्य, एल, एम पश्चिम, एस या तेरा विभाग कार्यालयांत (वॉर्ड ऑफिस) विवाह नोंदणी सेवा देण्यात येईल. तर, दर रविवारी बी, डी, एफ उत्तर, जी उत्तर, एच पश्चिम, के पश्चिम, पी पूर्व, आर दक्षिण, आर उत्तर, एन, एम पूर्व, टी या बारा विभाग कार्यालयांत (वॉर्ड ऑफिस) विवाह नोंदणी करता येईल.