Canara Bank Bharti 2025: कॅनरा बँकेत 3500 जागांसाठी भरती, थेट मुलाखतींतूनच होणार निवडप्रक्रिया; अर्जाची लिंक बातमीत

Last Updated:

Canara Bank Bharti 2025 : कॅनरा बँकेमध्ये तरुणांसाठी नोकरीच्या संधी निघाल्या आहेत. शिकाऊ विद्यार्थ्यांसाठी कॅनरा बँकेमध्ये अप्रेंटिसशिप सुरू झाली आहे. नेमक्या कोण कोणत्या पदासाठी ही भरती केली जाणार आहे ? शिवाय एकूण किती जागा आहेत? जाणून घेऊया....

News18
News18
तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात आहात? जर हो, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे... कॅनरा बँकेमध्ये तरुणांसाठी नोकरीच्या संधी निघाल्या आहेत. शिकाऊ विद्यार्थ्यांसाठी कॅनरा बँकेमध्ये अप्रेंटिसशिप सुरू झाली आहे. नेमक्या कोण कोणत्या पदासाठी ही भरती केली जाणार आहे ? शिवाय एकूण किती जागा आहेत? जाणून घेऊया....
कॅनरा बँकेमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी अप्रेंटिसशिप साठी भरती केली जात आहे. वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. बँकेच्या नोकरीसाठी दिलेल्या जाहिरातीमध्ये, ही भरती मोहीम 3500 प्रशिक्षण जागांसाठी राबवली जाणार आहे. अर्जदाराचे वय किमान 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे पूर्ण असावेत. अर्जदाराचे कमाल आणि किमान वय 1 सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्ण असावे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी 5 वर्षे तर, इतर मागासवर्गीय वर्गातील उमेदवारांना 3 वर्षे आणि अपंग उमेदवारांसाठी 10 वर्षांची वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे, अशी देखील भरतीसाठी पात्रता निकष आहेत.
advertisement
अर्जदाराकडे भारत सरकारच्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी असणे आवश्यक आहे किंवा केंद्र सरकारने मान्यता दिलेली समकक्ष पात्रता असावी. अर्जदाराने 1 जानेवारी, 2022 पासून 1 सप्टेंबर 2025 पर्यंत पदवी उत्तीर्ण केलेली असावी. ज्या अर्जदाराने 10वी किंवा 12वीची गुणपत्रिका सादर केली आहे, त्यामध्ये त्यांनी निवडलेली स्थानिक भाषा शिकल्याचे नमूद असेल तर अशा उमेदवारांना स्थानिक भाषेची चाचणी देणे आवश्यक नाही. इतर उमेदवारांसाठी निवड प्रक्रियेचा भाग म्हणून स्थानिक भाषेच्या ज्ञानाची चाचणी घेतली जाईल. ही चाचणी बँक उमेदवाराला कागदपत्र पडताळणीसाठी बोलावल जाईल तेव्हा निवडलेल्या शिकाऊ उमेदवारांची निवड बँकेच्या आवश्यकतेनुसार वैद्यकीयदृष्ट्या पात्र घोषित झाल्यानंतरच निश्चित केली जाईल.
advertisement
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अपंग (PwD) उमेदवारांना अर्ज शुल्क नाही. इतर सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 500 रुपये आहे. उमेदवारांनी कॅनरा बँकेच्या अधिकृत वेबसाइटला canarabank.bank.in ला भेट देऊन आपला अर्ज भरायचा आहे. अर्जदारांनी होम पेजवर, Engagement of Graduate Apprentice in Canara Bank under Apprenticeship या लिंकवर क्लिक करून आपला अर्ज भरायचा आहे. आवश्यक त्या कागदपत्राची माहिती फॉर्ममध्ये भरून अर्ज सबमिट करायचा आहे. संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर अर्जदाराने आपला फॉर्म सेव्ह करायला विसरू नका.
advertisement
फॉर्म भरण्यापूर्वी अर्जदारांना अधिक माहितीसाठी कॅनरा बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कॅनरा बँकेमध्ये अप्रेंटिसशिपच्या कालावधीत शिकाऊंना दरमहा 15,000 रुपये इतके मानधन (भारत सरकारकडून मिळणारी अनुदान रक्कम समाविष्ट असल्यास) दिले जाईल. शिकाऊंना इतर कोणतेही भत्ते किंवा सुविधा मिळणार नाहीत. कॅनरा बँक दरमहा 10,500 रुपये इतकी रक्कम थेट शिकाऊंच्या खात्यात जमा करेल. शिवाय, भारत सरकारकडून मिळणारे 4500 रुपये इतके मानधन विद्यमान मार्गदर्शक तत्त्वांनुसार डीबीटी (DBT) पद्धतीने थेट शिकाऊंच्या बँक खात्यात जमा केले जाईल. आवश्यक असल्यास पगार कपातीची (Loss of Pay) समायोजना करून हे मानधन दरमहा शिकाऊंना देण्यात येईल.
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Canara Bank Bharti 2025: कॅनरा बँकेत 3500 जागांसाठी भरती, थेट मुलाखतींतूनच होणार निवडप्रक्रिया; अर्जाची लिंक बातमीत
Next Article
advertisement
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री, 'या' अभिनेत्यासाठी वेडी
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री असं का म्हणाली?
    View All
    advertisement