Central Railway Mega Block : मध्य रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक; भायखळा- सायन स्थानक दरम्यान पायाभूत कामासाठी ब्लॉक

Last Updated:

Mumbai Local Mega Block : शनिवारी रात्रकालीन मेगाब्लॉक मध्य रेल्वेवर घेण्यात येणार आहे. सायन (शीव) आणि भायखळा अशा दोन रेल्वे स्थानकांवरील पादचारी पुलाच्या कामांसाठी मध्य रेल्वेकडून दोन विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Mumbai Local: घराबाहेर पडताय पण जायला ट्रेनच नाही असं व्हायला नको, रविवारी या मार्गावर ट्रेन बंद! पाहा संपूर्ण शेड्युल
Mumbai Local: घराबाहेर पडताय पण जायला ट्रेनच नाही असं व्हायला नको, रविवारी या मार्गावर ट्रेन बंद! पाहा संपूर्ण शेड्युल
मध्य रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. शनिवारी रात्रकालीन मेगाब्लॉक मध्य रेल्वेवर घेण्यात येणार आहे. सायन (शीव) आणि भायखळा अशा दोन रेल्वे स्थानकांवरील पादचारी पुलाच्या कामांसाठी मध्य रेल्वेकडून दोन विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. सायन आणि भायखळा या दोन रेल्वे स्थानकांवर पादचारी पुलाच्या तुळ्या बसवण्यासाठी दोन विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहेत. दोन वेगवेगळ्या भागांमध्ये मध्य रेल्वेकडून हा रात्रकालीन विशेष ब्लॉक घेतला आहे.
भायखळा स्थानकावर पादचारी पुलाचे 4 स्टील गर्डर्स बसवण्यासाठी 110 मेट्रिक टन रोड क्रेन वापरून लावण्यात येणार आहे. तर, सायन (शीव) उड्डाणपुलाजवळ पादचारी पुलाचा 40 मीटर स्पॅन बसवण्यासाठी 250 मेट्रिक टन रोड क्रेन वापरून गर्डर्स लावण्यात येणार आहे. शनिवार आणि रविवारच्या रात्री मध्य रेल्वेकडून दोन विशेष वाहतूक ब्लॉक घेत हे गर्डर्स बसवले जाणार आहेत. मध्य रेल्वेच्या प्रवाशांना शनिवारच्या रात्रकालीन ब्लॉकमुळे मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागणार आहे.
advertisement
शनिवारच्या रात्रकालीन ब्लॉक मध्यरात्री 12:30 ते पहाटे 04:30 पर्यंत घेतला जाणार आहे. हा मेगाब्लॉक भायखळा ते परळ स्थानकादरम्यान अप आणि डाऊन सोबतच धिम्या आणि जलद मार्गावरही लावला जाणार आहे. याशिवाय, दादर ते कुर्ला स्थानकादरम्यान अप आणि डाऊन सोबतच धिम्या आणि जलद मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक रेल्वेकडून शनिवारी मध्यरात्री 01:10 ते पहाटे 04:10 या काळामध्ये घेतला जाणार आहे. दादर स्थानकावरून रात्री 10:18 या वेळेत सुटणारी दादर- कुर्ला लोकल सुद्घा धावणार नाही.
advertisement
तर, कल्याण स्थानकावरून रात्री 11:15 वाजता सुटणारी कल्याण- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 15 डब्ब्यांची लोकल सुद्धा धावणार नाही. सोबतच, कसारा स्थानकावरून रात्री 10 सुटणारी कसारा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल ठाणे स्थानकापर्यंतच चालवली जाणार आहे. जी रात्री ठाणे स्थानकावर 11:49 वाजता पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून रात्री 12:24 वाजता सुटणारी सीएसएमटी- ठाणे ही अखेरची लोकलही धावणार नाही. ती लोकल सुद्धा रद्द करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे 04:19 या वेळेत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कसारा लोकल ठाणे येथून पहाटे 05:14 वाजता सुटेल. ठाणे येथून पहाटे 04:04 या वेळेत सुटणारी ठाणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकलही रद्द करण्यात आली.
advertisement
लोकलप्रमाणेच दोन एक्सप्रेसच्याही मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे. गाडी क्रमांक 11020 भुवनेश्वर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस कुर्ला येथे रात्री 03:28 ते पहाटे 04:15 पर्यंत थांबविण्यात येणार आहे. या एक्सप्रेसला दादर स्थानकापर्यंतच चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 12810 हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस ठाणे येथे रात्री 03:43 ते पहाटे 4 पर्यंत थांबवण्यात येईल. यासोबतच एक्सप्रेसलाही दादर स्थानकापर्यंतच चालवण्यात येणार आहे.
मराठी बातम्या/मुंबई/
Central Railway Mega Block : मध्य रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक; भायखळा- सायन स्थानक दरम्यान पायाभूत कामासाठी ब्लॉक
Next Article
advertisement
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री, 'या' अभिनेत्यासाठी वेडी
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री असं का म्हणाली?
    View All
    advertisement