Railway Update: कोकणातून पश्चिम महाराष्ट्रात धावणार रेल्वे, कोणती दोन शहरं जोडणार?
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Railway Update: या रेल्वे मार्गामुळे कोकणवासीयांसोबतच पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना सुद्धा मोठा फायदा होणार आहे.
सिंधुदुर्ग: सह्याद्री पर्वतरांगेमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांची विभागणी झाली आहे. या दोन्ही विभागांतून रेल्वे प्रवास करण्यासाठी सध्या सहजसोपा मार्ग उपलब्ध नाही. त्यामुळे रेल्वे प्रवास करणाऱ्यांना वळसा घालून आणि जास्त वेळ खर्च करून प्रवास करावा लागतो. मात्र, लवकरच ही समस्या सुटणार आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या नव्या रेल्वे प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सिंधुदुर्गातील वैभववाडी ते कोल्हापूर हा नवीन रेल्वे मार्ग तयार होणार आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या रेल्वे मार्गामुळे कोकणवासीयांसोबतच पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना सुद्धा मोठा फायदा होणार आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्रातील शेती मालाची रस्ते मार्गाने कोकणात वाहतूक केली जाते. तर कोकणातील खनिजांची वाहतूकही रस्ते मार्गानेच होते. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास या वाहतुकीला सोपा पर्याय उपलब्ध होईल.
advertisement
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी कोकणातील रेल्वे समस्यांबाबत चर्चा करून काही मागण्या देखील मांडल्या. रेल्वेमंत्र्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक सहकार्य आणि कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
वैभववाडी ते कोल्हापूर या रेल्वेमार्गामुळे इतर उद्योगांव्यतिरिक्त या भागातील विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील औष्णिक ऊर्जा प्रकल्पांसाठी कोळशाच्या वाहतुकीला मदत मिळणार आहे. शिवाय, पश्चिम महाराष्ट्रातील उत्पादित शेतीमाल बंदरापर्यंत पोहोचवण्यास सुलभ आणि किफायतशीर मार्ग मिळेल. यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळेल. शिवाय, या रेल्वे मार्गामुळे पर्यटनाला देखील फायदा होणार आहे.
Location :
Sindhudurg,Maharashtra
First Published :
September 26, 2025 4:40 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Railway Update: कोकणातून पश्चिम महाराष्ट्रात धावणार रेल्वे, कोणती दोन शहरं जोडणार?