Bullet Train: मेट्रोच नाही तर बुलेट ट्रेनही जाणार नवी मुंबई विमानतळावर! अहमदाबाद-मुंबई मार्गाबाबत मोठी अपडेट

Last Updated:

Bullet Train: नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ उभारलं जात आहे. या विमानतळापर्यंत जाण्यासाठी सर्व प्रकारची कनेक्टिव्ही वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Bullet Train: मेट्रोच नाही तर बुलेट ट्रेनही जाणार नवी मुंबई विमानतळावर! अहमदाबाद-मुंबई मार्गाबाबत मोठी अपडेट
Bullet Train: मेट्रोच नाही तर बुलेट ट्रेनही जाणार नवी मुंबई विमानतळावर! अहमदाबाद-मुंबई मार्गाबाबत मोठी अपडेट
मुंबई: देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि अहमदाबाद ही दोन शहरं बुलेट ट्रेनने जोडली जात आहेत. सुमारे 508 किलोमीटर लांबीच्या या महत्त्वकांक्षी प्रकल्पामुळे प्रवासाचा कालावधी लक्षणीय कमी होणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष बुलेट ट्रेन कधी धावतेय याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. या प्रकल्पाबाबत आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेनमार्ग पुढे नवी मुंबई विमानतळाशी जोडली जाणार असल्याची चर्चा आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ उभारलं जात आहे. या विमानतळाचं काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. या विमानतळापर्यंत जाण्यासाठी सर्व प्रकारची कनेक्टिव्ही वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या कनेक्टिव्हिटीमध्ये बुलेट ट्रेनचीही भर पडण्याची शक्यता आहे. यासंदर्भातला प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
advertisement
नवीन मुंबई विमानतळापर्यंत बुलेट ट्रेन कॉरिडॉरची निर्मिती करण्याचा विचार केला जात आहे. प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी या कॉरिडॉर निर्मिती केली जाणार आहे. जर या प्रस्तावाला मान्यता मिळाली तर नवी मुंबईतील विमानतळापर्यंत बुलेट ट्रेन धावेल. यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होऊन प्रवासाची गुणवत्ता देखील वाढेल.
सादर झालेल्या प्रस्तावावर रेल्वे बोर्डाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. रेल्वे बोर्ड याबाबत काय निर्णय घेणार, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला पायाभूत सुविधा देण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकारकडून केलं जात आहे. विमानतळापर्यंत मेट्रोमार्गाला अगोदरच मान्यता मिळाली आहे. त्यापाठोपाठ आता बुलेट ट्रेनही तिथे पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Bullet Train: मेट्रोच नाही तर बुलेट ट्रेनही जाणार नवी मुंबई विमानतळावर! अहमदाबाद-मुंबई मार्गाबाबत मोठी अपडेट
Next Article
advertisement
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री, 'या' अभिनेत्यासाठी वेडी
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री असं का म्हणाली?
    View All
    advertisement